दोन अफाट विनोदबुद्धी असलेले कलाकार एकत्र आले कि अप्रतिम कथेची निर्मिती होते याचं एक उत्तम उदाहरण असलेली एक जोडी म्हणजे अभिनेते दादा कोंडके आणि अभिनेते अशोक सराफ. पांडू हवालदार, राम राम गंगाराम यांसारख्या सिल्वर जुबली ठरलेल्या चित्रपटांमधून या दोघांची सद्सदविवेकबुद्धी किती अफाट होती यांची जाणीव होते. आज ही या दोंघाचं काम बघताना प्रेक्षक कधीच निराश होत नाहीत. (Ashok Saraf Monkey Attack)
पडद्यावर दिसणाऱ्या विनोदा सोबतच चित्रपटाची निर्मिती करताना घडलेली देखील काही मजेदार किस्से अशोक सराफ यांनी त्यांच्या बहुरूपी या आत्मचरित्रात सांगितले आहेत. राम राम गंगाराम चित्रपटात अशोक सराफ यांच्या सोबत असलेलं माकडं आणि अशोक सराफ यांच्या मध्ये गमतीदार किस्सा घडला होता नक्की काय आहे किस्सा जाणून घेऊयात इट्स मज्जाच्या जपलं ते आपलं च्या या भागात.
तर घडलं असं होत चित्रपटात गरज होती एका माकडाची आणि अशोक सराफ यांचे त्या माकड सोबतचे काही सीन होते. आताच्या प्राण्यांसारखी त्या कालचे प्राणी काही जास्त प्रशिक्षित न्हवते जेमतेम मदाऱ्या ने जेवढं शिकवलं असेल तेवढच. त्यामुळे अशोक सराफ यांनी ते सीन माकडा सोबत करताना माकडाने त्यांना काही त्रास दिला नाही. पुढे दुसरा सीन चालू असताना अशोक सराफ तो सीन बघत होते तेव्हा ते माकड त्यांच्या खांद्यावरच आहे हे विसरले आणि मामा सीन छान शूट झाल्यावर मोठ्याने ओरडले ” ए शाब्बास” हे ऐकताच त्या माकडाने अशोक मामांच्या डोक्यावर सणसणीत टपली मारली. तेव्हा अशोक सराफ यांना समजलं कि माकडा समोर कधी मोठ्याने ओरडायच नाही.(Ashok Saraf Monkey Attack)
पुढे या चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि दादा कोंडके – अशोक सराफ या जोडीची यशस्वी घोडदौड पुढे चालूच राहिली.
हे देखील वाचा – कोणतही काम पाहिलं नसताना ‘किती पैसे घेणार? जेव्हा दादा कोंडके मामांना हा प्रश्न विचारतात….