बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंह सध्या नेहमी चर्चेत असतो. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याच्या आवजाची जादूदेखील सर्वांवर असलेली पाहायला मिळते. चित्रपटांमध्ये गाण्याव्यतिरिक्त त्याचे जगभरातदेखील कॉन्सर्ट होताना दिसून येतात. त्याचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. तसेच त्याने असे काही कृत्य केलं ज्यामुळे त्याची चर्चादेखील होताना दिसत आहे. (arijit singh music concert)
अरिजितचा लंडनमध्ये एक कॉन्सर्ट सुरु होता. यावेळी भावुक करणारा एक प्रसंग घडला आहे. यामध्ये हजारो लोकांच्या समोर तो परफॉर्म करताना दिसत आहे. गाणं गाताना नेहमी गायकाचे लक्ष परफॉर्मन्सवर असतं. मात्र अरिजितचे लक्ष त्याच्या चाहत्यांवरदेखील असलेले दिसून येते. अशातच त्याचा एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ऑडियन्समध्ये असणारी एक चाहती असून ती रडताना दिसत आहे. तिला असं नाराज झालेलं बघून अरिजित त्याचा परफॉर्मन्स थांबवतो.
दरम्यान या कॉन्सर्टमध्ये तो ‘रॉकी और रानी की प्रेमकहाणी’ या चित्रपटातील ‘वे कमलेया’ हे गाणं गात आहे. हे ऐकताच ती भावनिक झालेली दिसून आली. तसेच ती रडू लागली. अरिजितची नजर तिच्यावर पडताच त्याने गाणं थांबवलं आणि मंचावरच बसला. त्यानंतर त्याने लगेचच ‘लापता लेडीज’मधील ‘सजनी’ हे गाणं गाण्यास सुरुवात केली. तसेच नंतर त्या चाहतीकडे बघून डोळे पुसण्याचा आणि हसण्याचा इशारादेखील देतो.
हा व्हिडीओ एका चाहत्याने सोशल मीडियावर आपलोड केला. तयामध्ये त्याने लिहिले की. त्या महिलेला अरिजितचे गाणं ऐकून तिचं प्रेम आठवलं. अरिजितने तिला धीर दिला व विसरून जा असेदेखील इशाऱ्याने सांगितले. तसेच हा कॉन्सर्ट तिच्या कायम लक्षात राहील असं देखील लिहिलं आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली असून सगळेच जण अरिजितचे कौतुक करताना दिसत आहेत.