Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला आता ५० दिवस झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रंगत चढत असल्याचे दिसून येत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील मैत्रीचं समीकरणच बदलून गेलेलं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला एकमेकांच्या कायम बरोबर असणारे सदस्य आता स्वतःचा गेम प्लॅन करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात डीपी अर्थात कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजय पोवार ताकदीने खेळताना दिसतो आहे. त्याचा गेम प्रेक्षकांना आवडतो आहे. पण आता डीपा त्याचा गेम बदलणार आहे. त्याने नवा निर्णय घेतला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या आठवड्यात दिसणाऱ्या एका टीममध्ये शेवटच्या आठवड्यातही तेच एकीचं चित्र पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. (Pushkar Jog On Dhananjay Powar)
‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच झालेल्या भागात धनंजयने स्वत:चा खेळ खेळणार असल्याचे म्हटलं. त्यांच्या या गेम प्लॅनचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला होता. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत संमिश्र प्रतिसाद दिला. या प्रोमोवर काही नेटकऱ्यांनी धनंजयला पाठींबा देत त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. तर काहींनी डीपीने आपला ग्रुप सोडू नये असं म्हटलं आहे. याच प्रोमोवर अभिनेता पुष्कर जोगनेददेखील कमेंट करत धनंजयचे कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss कडून घरातील गॅस वापरण्यासाठी मोजकाच वेळ, तारांबळ उडताच निक्की-वर्षा यांच्यामध्ये वाद पेटला कारण…
या प्रोमोखाली पुष्करने “डीपी हुशार आणि बुद्धिमान आहे. आता त्याच्या जिंकण्याचा हाच योग्य मार्ग आहे”असं म्हटलं आहे. यावर काही नेटकऱ्यांनी पुष्करचीच शाळा घेतली आहे. कारण पुष्करने काही दिवसांपूर्वी “डीपी या घरातून बाहेर जाणार” असं म्हटलं होतं. पुष्करच्या याच वक्तव्याची आठवण करुन देत एका नेटकऱ्याने पुष्करला डीपीबद्दलच्या जुन्या व्यक्तव्याची आठवण करुन दिली आणि असं म्हटलं की, “परवा तर म्हणत होता डीपी बाहेर जाणार आहे”. नेटकऱ्याच्या या प्रश्नावर पुष्करनेदेखील उत्तर दिलं आहे. पुष्करने उत्तर देत असं म्हटलं आहे की, “डीपी या घरातून बाहेर जाणार” असं म्हटलं होतं. पण त्याने आता त्याचा खेळ सुधारला आहे”.
आणखी वाचा – कॅन्सरशी झुंज देत आहे हिना खान, अभिनेत्री रुग्णालयात भरती, म्हणाली, “रडायचं नाही असं…”
दरम्यान, गेले काही दिवस डीपी आपल्या ग्रुपपासून वेगळे वेगळे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारच्या भागातही डीपी आपल्या ग्रुपपासू वेगळा जेवताना दिसला होता. वेगळा बसताना दिसला. यावरुन अभिजीत, पॅडी व अंकिता यांच्यात चर्चाही झाली. अशातच आता या नवीन प्रोमोमुळे डीपीने त्याचा वेगळा मार्ग निवडला असल्याचे दिसत आहे