रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ब्रेकअपनंतरही अर्जुन कपूरने मलायकाची सोडली नाही साथ, वडिलांच्या मृत्यूनंतर धीर देताना दिसला अभिनेता, व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 12, 2024 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ajrun kapoor with malaika arora

ब्रेकअपनंतरही अर्जुनने नाही सोडली मलायकाची साथ

सध्या बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा खूप चर्चेत आहे. बुधवारी सकाळी तिच्या वडिलांनी राहत्या घराच्या इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने कुटुंबियाना मोठा धक्का बसला आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजताच पुण्याला असलेली मलायका लगेच मुंबई येथील वाडिलांच्या घरी पोहोचली. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिची अवस्था खूप वाईट असलेलीदेखील पाहायला मिळाली. बॉलिवूडमधील सर्व कलाकार मंडळी मलायकाच्या घरी सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते. अशातच रात्री सर्व झाल्यानंतर मलायका घरातून बाहेर पडताना दिसली. (ajrun kapoor with malaika arora)

मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान सर्वप्रथम उपस्थित होता. त्यानंतर तिथे तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरदेखील उपस्थित असलेला दिसून आला. त्याचा व्हिडीओदेखील समोर आला होता. सकाळपासून रात्रीपर्यंत अर्जुन मलायकाबरोबर दिसून आला. त्यांचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मलायका, अमृता अरोरा, करिश्मा कपूर, करीना कपूर, टेरेन्स असे सगळे जण दिसून आले. यामध्ये तिच्याबरोबर अर्जुन धीर देताना दिसून आला.

आणखी वाचा – मलायकाच्या वडिलांचे त्यांच्या डायरीत दडलेय मृत्यूचे कारण, मुंबई पोलीस शोधात व्यस्त, आत्महत्येचं नेमकं कारण काय?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यामध्ये अर्जुन बिल्डिंगबाहेर दिसून येत आहे. मलायका कारकडे जात असताना तिला मदत करताना दिसत आहे. त्यांच्याबरोबर मलायकाचा मुलगा अरहानदेखील दिसत आहे. अभिनेत्रीसाठी त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक जण अर्जुनचे कौतुक करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – “आमच्यासाठी हा कठीण काळ आहे”, वडिलांच्या मृत्यूनंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, भावुक होत म्हणाली, “चांगला मित्र…”

दरम्यान वडिलांच्या जाण्याचे दु:ख मलायकाला खूप झालं आहे. तिने त्यांच्या आठवणीत सोशल मीडियावर एक पोस्टदेखील शेअर केली आहे. या भावनात्मक पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही अत्यंत दु:खी मनाने घोषणा करत आहोत की आमचे प्रिय वडील अनिल मेहता आता आमच्यात राहिले नाहीत. तो एक सौम्य आत्मा, एक चांगला पिता, एक प्रेमळ पती आणि आमचा सर्वात चांगला मित्र होता”.

पुढे तिने लिहिले की, “मलायकाने पुढे लिहिले की, “आम्ही गमावलेल्या गोष्टींमुळे आमचे कुटुंब काळजीमध्ये आहे, त्यामुळे मी माध्यमांना व माझ्या हितचिंतकांना विनंती करते की, त्यांनी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी. कारण आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. आम्ही तुमची समज, समर्थन आणि आदर याला प्रोत्साहन देत आहोत”.

Tags: arjun kapoormalaika aroraviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 jahnavi killekar anger

Bigg Boss Marathi : "निक्कीला काय प्रॉब्लेम आहे?", अरबाजची कानउघडणी करत जान्हवीचा थेट सवाल, धमकीही दिली, म्हणाली, "तुमच्या विरुद्धच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.