सध्या बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा खूप चर्चेत आहे. बुधवारी सकाळी तिच्या वडिलांनी राहत्या घराच्या इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने कुटुंबियाना मोठा धक्का बसला आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजताच पुण्याला असलेली मलायका लगेच मुंबई येथील वाडिलांच्या घरी पोहोचली. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिची अवस्था खूप वाईट असलेलीदेखील पाहायला मिळाली. बॉलिवूडमधील सर्व कलाकार मंडळी मलायकाच्या घरी सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते. अशातच रात्री सर्व झाल्यानंतर मलायका घरातून बाहेर पडताना दिसली. (ajrun kapoor with malaika arora)
मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान सर्वप्रथम उपस्थित होता. त्यानंतर तिथे तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरदेखील उपस्थित असलेला दिसून आला. त्याचा व्हिडीओदेखील समोर आला होता. सकाळपासून रात्रीपर्यंत अर्जुन मलायकाबरोबर दिसून आला. त्यांचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मलायका, अमृता अरोरा, करिश्मा कपूर, करीना कपूर, टेरेन्स असे सगळे जण दिसून आले. यामध्ये तिच्याबरोबर अर्जुन धीर देताना दिसून आला.
यामध्ये अर्जुन बिल्डिंगबाहेर दिसून येत आहे. मलायका कारकडे जात असताना तिला मदत करताना दिसत आहे. त्यांच्याबरोबर मलायकाचा मुलगा अरहानदेखील दिसत आहे. अभिनेत्रीसाठी त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक जण अर्जुनचे कौतुक करताना दिसत आहेत.
दरम्यान वडिलांच्या जाण्याचे दु:ख मलायकाला खूप झालं आहे. तिने त्यांच्या आठवणीत सोशल मीडियावर एक पोस्टदेखील शेअर केली आहे. या भावनात्मक पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही अत्यंत दु:खी मनाने घोषणा करत आहोत की आमचे प्रिय वडील अनिल मेहता आता आमच्यात राहिले नाहीत. तो एक सौम्य आत्मा, एक चांगला पिता, एक प्रेमळ पती आणि आमचा सर्वात चांगला मित्र होता”.
पुढे तिने लिहिले की, “मलायकाने पुढे लिहिले की, “आम्ही गमावलेल्या गोष्टींमुळे आमचे कुटुंब काळजीमध्ये आहे, त्यामुळे मी माध्यमांना व माझ्या हितचिंतकांना विनंती करते की, त्यांनी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी. कारण आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. आम्ही तुमची समज, समर्थन आणि आदर याला प्रोत्साहन देत आहोत”.