रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्यासाठी हा कठीण काळ आहे”, वडिलांच्या मृत्यूनंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, भावुक होत म्हणाली, “चांगला मित्र…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 12, 2024 | 10:17 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Malaika Arora Statement On Father Demise

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची भावुक पोस्ट

काल मलायका अरोराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं दिसलं. मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. मलायका अरोराने तिचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाच्या वृत्ताला पोस्ट करत दुजोरा दिला आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांच्या निधनाची बातमी दिली असून तिचे वडील चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे. मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये तिने माध्यमांना व चाहत्यांना विनंतीही केली आहे. (Malaika Arora Statement On Father Demise)

मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि ही बातमी मिळताच मलायकाच्या आईच्या घरी तारे-तारकांची गर्दी पाहायला मिळाली. मलायकाने आपल्या वडिलांच्या निधनाच्या बातमीवर एक पोस्ट शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा – “सुसाईड नोट सापडली का?”, मलायकाच्या वडिलांच्या निधनाबाबत मुंबई पोलिसांची प्रतिक्रिया, म्हणाले, “ही आत्महत्या वाटत…”

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

या पोस्टमध्ये मलायकाने लिहिले की, “आम्ही अत्यंत दु:खी मनाने घोषणा करत आहोत की आमचे प्रिय वडील अनिल मेहता आता आमच्यात राहिले नाहीत. तो एक सौम्य आत्मा, एक चांगला पिता, एक प्रेमळ पती आणि आमचा सर्वात चांगला मित्र होता”. मलायकाने पुढे लिहिले की, “आम्ही गमावलेल्या गोष्टींमुळे आमचे कुटुंब काळजीमध्ये आहे, त्यामुळे मी माध्यमांना व माझ्या हितचिंतकांना विनंती करते की, त्यांनी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी. कारण आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. आम्ही तुमची समज, समर्थन आणि आदर याला प्रोत्साहन देत आहोत”.

आणखी वाचा – “मूल होत नाही म्हणून हिणवलं…”, आई होऊ शकत नसल्याने ऐकावे लागले होते टोमणे, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “खूप त्रास…”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल अरोरा यांनी घराच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची बातमी ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गेला असून मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे. मलायका अरोरा शहराबाहेर होती तिला ही बातमी मिळताच ती मुंबईत परतली. या अपघातामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Tags: bollywood newsMalaika Arora Father DeathMalaika Arora Statement On Father Demise
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Malaika Arora Father Death

मलायकाच्या वडिलांचे त्यांच्या डायरीत दडलंय मृत्यूचे कारण, मुंबई पोलीस शोधात व्यस्त, आत्महत्येचं नेमकं कारण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.