सध्या बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका आरोराच्या घरी सध्या दु:खाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी तिच्या वडिलांनी इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांचे पार्थिव आता रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस आता पुढील तपासणी करत असून त्यांच्या मृत्यूचे कारण लवकरच शोधून काढतील असे म्हंटलं जात आहे. आता याबाबत अनेक खुलासेदेखील होताना दिसत आहेत. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ कोणतीही चिट्ठि आढळून आली नाही. मात्र त्यांची पत्नी जॉयस पॉलिकार्प यांनी दिलेली माहिती समोर आली आहे. (malaika arora mother on father death )
अनिल यांच्या मृत्यूबद्दलची माहिती जॉयस यांनी दिली आहे. बुधवारी सकाळी नक्की काय झाले याबद्दल त्यांनी सांगितले आहे. ‘न्यूज १८’च्या अहवालानुसार, मलायकाच्या आईने अनिल यांचा दिनक्रम संगितला. त्यांनी सांगितले की, अनिल रोज सकाळी बाल्कनीमध्ये बसून वर्तमानपत्र वाचत असत. त्यांचा घटस्फोट झाला होता मात्र गेल्या काही वर्षांपासून ते पुन्हा एकदा एकत्र राहू लागले होते. ते आयशा मॅनोरच्या सातव्या मजल्यावर राहायचे.
जॉयस यांनी सांगितले की, “बुधवारी सकाळी ते लिव्हिंग रुममध्ये अनिल यांच्या चप्पल पाहिल्या व त्यांना बघण्यासाठी बाल्कनीमध्ये गेले. जेव्हा ते बाल्कनीमध्ये पण दिसले नाहीत तेव्हा मी वाकून खाली पाहिले. वॉचमन मदतीसाठी ओरडत होते. अनिल खाली पडले होते”. अनिल यांच्या तब्येतीबद्दल सांगायचे झाले तर ते गेल्या काही काळापासून आजारी होते. पण मलायकाच्या आईने हे सगळं नाकारलं. त्यांना कोणताही आजार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचे फक्त गुडघे दुखायचे”.
‘एएनआय’च्या वृत्तानुसार, सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळी सगळी टीम पोहोचली. या प्रकरणाचा योग्य रीतीने तपास केला जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान वाडिलांच्या निधनाची माहिती मिळाली तेव्हा ती पुण्यात होती. ती तडक निघाली आणि मुंबईतील घरी पोहोचली. तसेच वाडिलांच्या निधनाची माहिती मिळताच अरबाज खानही तिथे पोहोचला. तसेच खान कुटुंबानेदेखील मलायकाला खूप धीर दिला आहे.