आयुष्यात कितीही चढउतार आले, नवीन वळणं आली तरीही काही नाती अगदी पहिल्यासारखी राहतात. कलाकारांच्या यादीतील मैत्रीपूर्ण नात्यांची जुनी नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री नीना कुळकर्णी. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी नाना पाटेकर या आपल्या जुन्या मित्राच्या फार्म हाऊस ला भेट दिली आणि तिथे अनुभवलेल्या काही गोष्टी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केल्या आहेत. नीना कुलकर्णी यांनी पोस्ट केलेल्या त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी नाना पाटेकर यांच्या हाताचं जेवण, गार्डन मध्ये खेळेल झोका, आंब्यांचा आस्वाद, निवांत मारलेल्या गप्पा याचे काही क्षण शेअर केले आहेत.(Nana Patekar Neena Kulkarni)
नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या या पोस्टच्या कॅप्शन मध्ये ‘ ये सालों की दोस्ती का मज़बूत जोड़ है..छूटेगा नहीं
१९७८ साली रंगमंचावर हमीदाबाईची कोठी हया नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो… विजया मेहतांच्या तालमीत तयार होता होता , हमिदाबाई ची कोठी, महासागर अश्या अविस्मरणीय नाटकांचे प्रयोग करता करता, सहकलाकारांचे मित्र झालो. सुखदुःखात साथ देत,भांडत ,हसत मस्तीत जगलो. होता होता आपआपल्या पाऊलवाटा शोधल्या. पण नाती सुटली नाहीत.. संबंध तुटले नाहीत.

आज ४५ हून अधिक वर्ष लोटली आहेत. तरीही स्नेह तसाच आहे, मैत्री वाढली आहे. मागील पानावरून पुढे! गप्पा, विनोद, चर्चा, प्रयोगातल्या आठवणींनी, दिवस रात्र अपुरे पडले! स्वतःच्या हातांने करुन वाढलेलं सुग्रास जेवण, नाना आणि त्याच्या परिवारा चं अगत्य, नाना च्या वाडीतली सुबत्ता… मन तृप्त झालं.’ असं या नाना पाटेकर यांच्या गावी व्यतीत केलेल्या दिवसांबद्दल लिहिलं आहे.(Nana Patekar Neena Kulkarni)
एकंदरीतच काय तर जुन्या मित्रांची ही जोडी पुन्हा एकत्र येऊन धमाल मज्जा करताना प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
हे देखील वाचा – कॅमेरामॅनच्या त्या कृत्याने अशोक सराफचे ‘अशोक मामा’ झाले..अशोक सराफ यांना असं पडलं मामा हे नाव