हल्ली ट्रेंड मध्ये राहण्यासाठी अनेक कलाकार काही विचित्र अवतार करताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांना सोबतच कधी कधी काही कलाकार ही या विचित्र अवतारांवर भाष्य करताना दिसतात. सध्या सुरु असलेल्या कान्स महोत्सव २०२३ मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायचा एक लुक असाच चर्चेत ठरतोय. आणि तिच्या या लुक वर द काश्मिरी फाइल्स या चित्रपटाचे दिगदर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील टीका केली आहे.(Aishwarya Rai Cannes Look)
ऐश्वर्याच्या या लुक वर एकीकडे ट्रॉलिंग सुरु असताना दिगदर्शक विवेक अग्नीहोत्री या लुक बद्दल ट्विट करत म्हणाले ‘ तुम्ही पोशाख सांभाळणारा गुलाम पाहिला आहे का? सध्या हा ट्रेंड भारतात हे अनेक महिला कलाकारांमध्ये पाहायला मिळतोय. आपण असे वागण्याइतके मूर्ख आहोत का? असा प्रश्न देखील विवेक यांनी ट्विट करत विचारला आहे. ट्विट सोबत त्यांनी ऐश्वर्याच्या लूकचा आणि ऐश्वर्या ने पारिधान केलेला गाऊन सांभाळणाऱ्या माणसाचा देखील फोटो पोस्ट केला आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील अनेक वर्षांपासून कान्स महोत्सवात सहभागी होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही हटके लुक मध्ये ऐश्वर्या ने या महोत्सवात भाग घेतला पण या वेळी तिच्या लुक ने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.(Aishwarya Rai Cannes Look)