बऱ्याचदा काही काही मोठ्या घटनांमागे एखाद्या सध्या कारणाचा वाटा असतो. अशीच एक छोटी घटना आणि आज त्याच्या परिणाम संपूर्ण मनोरंजन विश्वात पाहायला मिळतोय. तुमचे आमचे सर्वांचे लाडके अभिनेते अशोक सराफ उर्फ अशोक मामा यांना मिळालेल्या मामा या उपाधी मागे नक्की कारण तरी काय याचा खुलासा आता खुद्द अशोक मामांनीच केलाय.(Story Behind Ashok Mama Name)
एका कार्यक्रम दरम्यान अशोक सराफ यांना तुम्हाला मामा हे नाव कस पडलं या बद्दल विचारण्यात आलं तेव्हा आहोम सराफ यांनी या मागची कथा सांगितली. अशोक सराफ यांनी सांगितलं ते कोल्हापूर मध्ये शूट करत होते आणि कोल्हापूर ,मध्ये एखाद्याला मामा म्हणणं हे मानानं बोललं जात असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तिथे शूट करत असताना त्यांचा कॅमेरामन त्याच्या मुलीला सेट वर घेऊन आला आणि त्याने मुलीला सांगितलं हे अशोक मामा आहेत.

आणि त्या नंतर तो ही ओघाने त्यांना मामा म्हणू लागला. आणि त्या कॅमेरामन मुळे संपूर्ण सेट वरील मंडळी अशो सराफ यांना मामा म्हणून लागली. या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले मामा म्हणण्याचा हा प्रकार इथेच थांबला नाही नंतर नंतर रस्त्यावरून जाणारी लोकंपण काय मामा? असे म्हणायला लागले.(Story Behind Ashok Mama Name)
तर महाराष्ट्राच्या लाडक्या हिरोला म्हणजेच अशोक सराफ यांना असं टोपण नाव पडलं अशोक मामा. आणि आजही अशोक मामा हे नाव अगदी आदरानं, प्रेमानं घेतलं जात.