रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाळाला जन्म देण्यापूर्वी दीपिका पदुकोणचं नवऱ्यासह मोठं पाऊल, मिळून घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, घरही बदलणार आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 29, 2024 | 12:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
deepika padukone and ranveer singh new house

दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांच्या नवीन घराची झलक

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण व रनवीर सिंह यांना खूप पसंती मिळते. पुढील महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार आहे. याबद्दलची घोषणा त्यांनी फेब्रुवारीमध्ये केली होती. त्यानंतर अनेकदा दीपिका बेबी बम्प फ्लॉंट करताना स्पॉट केले गेले. तिचा प्रेग्नन्सीमधील ग्लोदेखील दिसून आला आहे. आशातच आता दीपिका-रणवीर व बाळाबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. बाळाचे आगमन नवीन घरात होणार असल्याची माहिती समोर आली असून याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. (deepika padukone and ranveer singh new house)

दीपिका व रणवीरने बाळासाठी तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे घर खरेदी केलं आहे. बिल्डिंगचा नवीन व्हिडीओ समोर आला असून त्याबद्दल माहिती समोर आली आहे. ही बिल्डिंग शाहरुख खानचे घर ‘मन्नत’पासून काही अंतरावरच आहे. हा भाग अत्यंत अलिशान आहे. रणवीर व दीपिकाने दोन वर्षांपूर्वीच या बिल्डिंगमध्ये घर बुक केले होते. तेव्हापासून हे काम सुरु होते. तसेच बाळाचे आगमन झाल्यानंतर ते नवीन घरामध्ये शिफ्ट होतील अशी माहितीदेखील समोर येत आहे. दरम्यान बिल्डिंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही संपूर्ण बिल्डिंग त्यांची आहे का? असे प्रश्नदेखील नेटकऱ्यांना पडले आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की-अरबाजच्या नात्याच्या The End, त्यासाठी घरातल्यांनाच ठरवलं कारणीभूत, म्हणाली, “मी जवळ येत होती पण…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दीपिका व रणवीर यांचे नवीन घर वांद्रे परिसरात असून शाहरुख त्यांचा शेजारी असणार आहे. अत्यंत सुंदर लोकेशन असून समुद्राचा सुंदर नजारादेखील बघायला मिळतो. ‘हाय राईज’ बिल्डिंगचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु होते. या घराबद्दल सांगायचे झाले तर, यासाठी तब्बल ११९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा व्यवहार देशातील महागड्या व्यवहारांपैकी एक मानला जात आहे. या इमारतीमध्ये १६, १७ व १८ व्या मजल्यावर फ्लॅट आहेत. घराचे एकूण क्षेत्रफळ ११,२६६ स्क्वेअर फुट आहे. तसेच १३०० स्क्वेअर फुटचे टेरेसदेखील आहे. याव्यतिरिक्त या इमारतीमध्ये १९ पार्किंग स्पेस आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की विरोधात अरबाजचे कान भरत आहे आर्या, फुकटचा सल्लाही दिला, म्हणाली, “तिने दगा दिला आता…”

तसेच या फ्लॅटसाठी ७.१३ कोटी रुपये स्टॅम्प ड्यूटीदेखील भरण्यात आली आहे. तसेच यामध्ये वैयक्तिक जीम, स्विमिंग पूल, मनोरंजानासाठी वेगळी जागादेखील आहे. दरम्यान फ्लॅटचा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने विचारले की, “संपूर्ण इमारत यांची आहे का”,  तसेच अजून एकाने लिहिले की, “हे घर फक्त तीन लोकांसाठी आहे का?”. दरम्यान काही दिवसांपूर्वी दीपिकाने मुलाला जन्म दिला असल्याचे समोर आले होते. मात्र या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचेदेखील समोर आले आहे.

Tags: deepika padukonenew houseranveer singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Devoleena Bhattacharjee Flaunts Baby Bump

देवोलीना भट्टाचार्जीने फ्लॉन्ट केलं बेबी बंप, आता दिसत आहे अशी, नेटकरी म्हणाले, "तू खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.