Justin Bieber Blesssed With Baby Boy : जगातील लोकप्रिय पॉप गायक जस्टिन बीबर आणि मॉडेल हेली बीबर अखेर आई-वडील झाले आहेत. चिमुकल्याच्या येण्याने बीबर कुटुंबात आनंद पसरला आहे. गायकाच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आहे, ज्याची माहिती त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर दिली आहे. याबरोबर त्यांनी मुलाचे नावही जाहीर केले आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच या जोडप्याच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. २४ ऑगस्ट रोजी, त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि एक हृदयस्पर्शी पोस्ट पोस्ट शेअर करत ही बातमी शेअर केली.
गायक जस्टिन बीबरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी शेअर केली आहे. फोटो शेअर करताना गायकाने कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “वेलकम होम जॅक ब्लूज बीबर”. जस्टिन व हेली बीबर यांनी त्यांच्या लहान मुलाचे नाव देखील चाहत्यांसह शेअर केले आहे, ज्याचा त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये उल्लेख केला आहे. याशिवाय दोघांनीही पोस्टमध्ये बाळाच्या लहान पायांची झलक दाखवली आहे.
जस्टिन बीबरने हेलीच्या गरोदरपणाची माहिती सोशल मीडियावर दिली होती, त्यानंतर तो सतत चर्चेत राहिला. यावर्षी तो अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी भारतात आला होता. मुंबईतील जिओ सेंटरमध्ये त्याचं कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. ज्याच्या क्लिप व्हायरल झाल्या आणि त्या क्लिपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने गायन विश्वात प्रवेश केला आणि आपल्या आवाजाने सर्वांवर जादू केली तेव्हापासून प्रत्येकजण त्याचा वेडा आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “ती माझ्या पायाखाली”, इरिनावरुन झालेल्या भांडणात वैभवचा राग अनावर, टीम A मध्ये ताटातूट?
या छोट्या पाहुण्याच्या घरी आल्याच्या आनंदाची बातमी ऐकून सर्वजण गायकाचे अभिनंदन करत आहेत. फोटोग्राफर डब्बू रत्नानी, अभिनेत्री स्मृती खन्ना यांनी अभिनंदन केले आहे. एकदा ‘द एलेन शो’मध्ये जस्टिन म्हणाला होता, “हेलीला हवी तितकी मुलं मला मान्य आहेत. मी माझा स्वतःचा ग्रुप तयार करेन. मला असे वाटते की शरीर तिचे आहे आणि ती तिला पाहिजे ते करु शकते”. त्याचवेळी, हेलीने ‘संडे टाइम्स’शी बोलताना सांगितले होते की, तिला मुलाला जन्म देण्याची भीती आहे.