Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या ए आणि बी अशा दोन टीम तयार झाल्या आहेत. असं असलं तरी, ‘टीम ए’मधील निक्की आणि ‘टीम बी’मधील अभिजीत सावंत या दोघांची चांगली मैत्री आहे. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं, मात्र आता ‘टीम बी’मधील सदस्यांनाही या मैत्रीवर आक्षेप असल्याचं दिसत आहे. पंचवीसाव्या दिवशी निक्कीचा वाढदिवस असतो, रात्री बारा वाजता अरबाज तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. डीपी तिला कोणाला छळू नको म्हणत हटके शुभेच्छा देता. या दिवशीही निक्की आणि अभिजीत यांच्या मैत्रीबद्दल सर्वजण चर्चा करतात. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘बिग बॉस’ निक्कीसाठी केकही पाठवतात, तेव्हा बर्थडे केक कापायला येण्यासाठी अरबाज आढेवेढे घेतो. आर्याही म्हणते की आज तिचा वाढदिवस आहे म्हणून मी तिला त्रास देणार नाही. केक कापल्यानंतर ती सर्वात पहिला केक अरबाजला भरवते. अभिजीत, निक्की व वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये अरबाजबद्दल चर्चा होते. एकंदरीत कालच्या भागात अभिजीत-निक्की यांची मैत्री हा एकच विषय असतो. अभिजीत व अरबाज एकमेकांशी चर्चा करत निक्कीबद्दलचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. यावेळी निक्कीला अभिजीत समजावतो की, आज तिचा वाढदिवस आहे, तर तिने आजच्या दिवशी तरी अरबाजवरील राग सोडावा.
यावेळी रात्री सर्वजण एकते बसलेले असताना अभिजीतने निक्कीच्या वाढदिवसानिमित्त गाणं गायलं पाहिजे असं सगळेजण म्हणतात. यावर अभिजीत आधी नाही नाही म्हणतो. मात्र निक्कीने बोलताच तो गाणं गायला लागतो. यावेळी अभिजीत निक्कीला “अभिजीत कृपया गाणं गा ना… माझा वाढदिवस आहे” असं म्हणते. यावर अभिजीत मी माझंचं गाणं गातो असं म्हणतो आणि तो ‘त्याचं लफ्जो में’ हे गाणं गातो. गाण्याच्या चार ओळी गात तो सर्वांचे मनोरंजन करतो. यावेळी अरबाज, वैभव अंकिता त्याची मस्करीही करतानाचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “ती माझ्या पायाखाली”, इरिनावरुन झालेल्या भांडणात वैभवचा राग अनावर, टीम A मध्ये ताटातूट?
दरम्यान, अभिजीत व निक्की यांच्या मैत्रीबद्दल घरातील दोन्ही टीमला असुरक्षितता वाटत आहे. दोघांच्या मनात नक्की काय आहे? ते नक्की कोणत्या टीमकडून खेळत आहेत? याबद्दल दोन्ही टीममध्ये संभ्रम आहे. एकमेकांमधील शुद्ध मैत्री ही त्यांची रणनीती आहे की आणखी काही? याबद्दल प्रेक्षक व सदस्य दोघेही साशंक आहेत. अभिजीत-निक्की यांच्यातील मैत्रीबद्दल अरबाज गंमतीने असंही म्हणतो की, ‘टीम ए’ आणि ‘टीम बी’ अभिजीत आणि निक्कीची आहे, बाकीचे सगळे ‘टीम सी’मध्ये आहेत.