शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीने खरेदी केली महागडी कार, कुटुंबियांबरोबर पूजा आणि जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 20, 2024 | 1:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Premachi Goshta serial Savani fame Apurva Nemlekar buy new car actress video shared on Instagram

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सावनीने घेतली नवीन कार, व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून सावनी या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’सारखी मालिका किंवा ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये खेळलेल्या विविध टास्कद्वारे स्वतःचं वैशिष्ट्य दाखवून दिलं आहे. अपूर्वानं मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील पसंती मिळते. अशातच तिच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Apurva Nemlekar Buy New Car)

अभिनेत्री अपूर्वाने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रक्षाबंधनचं खास औचित्य साधत अपूर्वाने एक नवीन अलिशान गाडी खरेदी केली आहे आणि या नवीन गाडीची खरेदी करतानाचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या नवीन गाडीची अभिनेत्रीने आपल्या कुटुंबासह पूजाही केली. याचीच खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर करत असं म्हटलं आहे की, “रक्षाबंधन आणि तिसरा श्रावणी सोमवार या शुभमुहूर्तावर आम्ही ही नवीन गाडी खरेदी केली आहे. याक्षणी मी माझ्या भावाला अन् वडिलांची खूप आठवण येत आहे”.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “सूरज आपल्यावर भारी पडतोय”, अरबाज घाबरला, पॅडीचाही गेम ऑन झाल्यामुळे भिती, म्हणाला, “यांचा गेम…”

अपूर्वाच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षर कोठारी, मेघा धाडे यांसारख्या अनेक कलाकारांनी अपूर्वाला तिच्या नवीन गाडीनिमित्त शुभेच्छा दिल्या असून तिचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “बायकांना हाडतुड करणारे मर्द पुरुष…”, निक्कीवर आवाज चढवून बोलला अरबाज, मराठी अभिनेता म्हणतो, “इतरांनी बोला कारण…”

दरम्यान, अपूर्वा नेमळेकर सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकानके मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती सावनी ही खलनायिका साकारत आहे. मुक्ता-सागरच्या संसारात दुरावा निर्माण करण्याचा सावनी पुरेपूर प्रयत्न करताना दिसते. अशा विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अपूर्वाने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Tags: apurva nemlekarApurva Nemlekar New Carmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada new promo Adhipati and Charulata meet each other

Tula Shikvin Changlach Dhada : अधिपती व त्याची खरी आई समोरासमोर, स्वीकार करणार का?, भूवनेश्वरीची नवी खेळी की आणखी काही?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.