Tharala Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, बऱ्याच वर्षांनी सायली प्रतिमाला घरी घेऊन येते. त्यामुळे सुभेदार कुटुंब खूप खुश असतात. सायलीवर सगळेच जण खुश असतात. इतक्या वर्षांनी तिने प्रतिमाची भेट घडवून आणल्याने पूर्णा आजीही आनंदी असतात. प्रतिमा घरात रुळावी म्हणून पूर्णा आजी आणि सगळेच जण काही ना काही प्रयत्न करत असतात. तर इकडे महीपत प्रतिमा परत आल्याने हे नेमकं कसं शक्य झालं याच्याच विचारात असतो. शिवाय नागराज व प्रियावर खोट्या डेड बॉडी प्रकरणाची टांगती तलवार असते.
महिपत नागराजला म्हणतो रविराजला आता प्रतिमाची खरी बॉडी सापडायला हवी यासाठी तू काहीतरी कर. तितक्यात साक्षी म्हणते आपण प्रतिमा चा खून करणार नाही त्यावर महिपत म्हणतो नागराज याबाबतीत विचार कर आणि मला कळव. इकडे सुभेदारांच्या घरी अंताक्षरी ची तयारी सुरू असते. सगळेजण अंताक्षरी खेळण्यासाठी उत्सुक असतात. दोन टीम पाडून अंताक्षरी खेळायला सुरुवात होते. तन्वी मनात म्हणते मी प्रतिमाला घाबरून ठेवलंय त्यामुळे ती आता बाहेर येणार नाही पण या अंताक्षरीमुळे मला अर्जुनच्या जवळ जाता येणार.
सगळेजण एकेक गाणे गायला सुरू करतात. खोलीत प्रतिमा सगळ्यांचं गाणं ऐकत असते पण तिला बाहेर जायची इच्छा होत नाही. सायली रविराज ला म्हणते आता तुम्ही गाणं गायला हवं प्रतिमा आत्यांच्या आवडीचं एखादं गाणं गा. रविराज गाणं गायला लागतो पण मध्येच त्याला ठसका लागल्याने पुढील गाणं सायली म्हणते त्या गाण्याचा आवाज ऐकून प्रतिमा खोलीतून बाहेर येत सायलीला घट्ट मिठी मारते व दोघीही रडू लागतात. घरातील सगळेजण भाऊ होतात.
आपण पुढील भागात पाहणार आहोत की, सायली अर्जुनला म्हणते तन्वी किती नशीबवान आहे आश्रमात राहूनही तिला तिची खरी आई सापडली. मलाही माझ्या आईला भेटून तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे.