शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “जान्हवीसाठी एकही कमेंट दाखवली नाही आणि…”, टीम बीमध्ये फूट पाडल्याच्या प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणाले, “भांडणं लावून दिली आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 19, 2024 | 11:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5

'बिग बॉस मराठी'मध्ये टीम एची बाजू घेत टीम बीच्या चुगल्या दाखवल्याने प्रेक्षक भडकले, नाराजी व्यक्त करत कमेंटही केल्या

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’चं पर्व हे सध्या धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वात एका मागोमाग एक स्पर्धक मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सततचे वाद, भांडण, हाणामारी, धक्काबुक्की, प्रेम हे सारं काही ‘बिग बॉस’च्या घरात एका छताखाली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चं यंदाचं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. हे सर्व विशेष होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख यांने साकारली आहे. रितेशने आजवर अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मात्र तो पहिल्यांदाच एका रिऍलिटी शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी साकारताना दिसत आहे.

‘बिग बॉस’च्या घरात सध्या स्पर्धक मंडळी एकमेकांहून वरचढ ठरत स्वतःला सिद्ध करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात टीम ए व टीम बी असे दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील टीम ए ही ‘बिग बॉस’च्या या पर्वातील अग्रेसिव, रागीट, स्वतःच खरं करणारी, माज दाखवणारी टीम असल्याचा पाहायला मिळालं. तर टीम बी शांत, संयमी, समजून घेणारी टीम असल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या भाऊच्या धक्क्यावर टीम ए मधील स्पर्धकांना हवं तितकं बोललं गेलं नसल्याचं अनेकांनी मत मांडत नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. टीम ए मधील जान्हवी किल्लेकरने शिवीगाळही केली मात्र त्यावेळी बिग बॉस यांनी आवाज म्युट केलेला पाहायला मिळाला आणि हे अत्यंत चुकीचं आहे आणि तिने दिलेल्या शिवीचा तिला जाबही विचारला नाही याचं अनेकांनी दुःख व्यक्त केले.

आणखी वाचा – “योगितावर अन्याय झाला”, Bigg Boss Marathiच्या घरातून योगिता चव्हाण बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “तिला परत आणा कारण…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

तर एकीकडे टीम बी मधील स्पर्धकांच्या चुकल्या दाखवून टीम बी फोडण्याचा प्रयत्न बिग बॉस यांनी केल्याने ‘बिग बॉस’वर प्रेक्षक नाराज असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक मंडळींनी या बिग बॉसच्या निर्णयावर, या वागणुकीवर आक्षेप घेतलेला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी कमेंट करत असं म्हटलं आहे की, “पुढारी, निक्की एलिमिनेशला आल्यावर एलिमिनेशन नाही. निक्की, जान्हवी बाहेर एवढ्या शिव्या खातात पण त्यांची एकपण कमेंट दाखवली नाही उलट असं दाखवलं की, ते किती चांगलं खेळत आहेत. आता बी टीममध्ये भांडणं लावून देत आहेत. म्हणजे ए वाल्यांना वाचवायचे सगळे प्रयत्न करत आहेत. एक वेळ अशी येईल की तुमचा तुमचा टीआरपी तुमच्यावरच उलटेल”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : किर्लोस्कर कंपनीचा खरा चेहरा कोण होणार?, दिशा-पारूमध्ये स्पर्धा, अहिल्यादेवी योग्य तो न्याय देतील का?

याशिवाय “टीम ए फोडा ‘बिग बॉस’ टीम बी ला एकत्र आणण्याचा प्रयत्न करा”, “‘बिग बॉस’च गद्दारी करत आहे. टीआरपीसाठी ‘बिग बॉस’ ग्रुपमध्ये भांडण लावायचे काम करत आहे”, “पहिली गोष्ट तर विश्वातघात सारखं कोणी काही वागलं नाही आहे आणि ‘बिग बॉस’ने टीम बी फोडायचा प्रयत्न केला आहे”, “सगळया चुगल्या अंकिताच्या दाखवून तिला व्हिलन बनवत आहे. दाखवायचं तर जान्हवीची चुगली दाखवा. निक्की विषयी ती जे काही बोलली ते दाखवा. नेहमी टीम ए घाण वागणार आणि आणि शाळा फक्त टीम बी ची होणार”, अशा अनेक कमेंट करत प्रेक्षकांनी संताप दाखवलेला पाहायला मिळत आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5colors marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan appreciated for take blessings of reel sister video viral on social media

Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने सुसंस्कृत म्हटलं पण सूरजने 'त्या' कृतीमधून केलं सिद्ध, अभिनेत्रीने राखी बांधताच पाया पडला अन्...; महाराष्ट्राला कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.