Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, ब्रँड अँबेसेडर होण्यासाठी दिशा व पारूमध्ये मोठी स्पर्धा सुरु असते. पारुला ही स्पर्धा मनापासून खेळायची नसते मात्र अहिल्यादेवींच्या शब्दाखातर आणि आदित्यला दिलेल्या शब्दाखातर पारू या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार होते. सुरुवातीला येतानाच पारू पारंपारिक अंदाजात येते तेव्हा दिशा सांगते की, तू या स्पर्धेचा नियम मोडला आहेस. तू तुझ्या देवी आईचं सगळं काही ऐकतेस ना मग स्पर्धेतून न खेळताच बाहेर पडणं ही त्यांची शिकवण आहे का? असे विचारताच देवी आईचा पारा चढतो.
एकीकडे आदित्यही पारूला म्हणतो की, हे तुला माझ्यासाठी करावंच लागेल. तुला माझ्यासाठी ही स्पर्धा जिंकावीच लागेल. तिने तुझ्या देवी आईच्या निर्णयावर शंका घेतली आहे त्यामुळे तुला हे सिद्ध करावेच लागेल. यावर पारू म्हणते की, “मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि यामुळेच पारू देखील स्पर्धेला तयार होते”. त्यावर देवी आई पारूला म्हणतात की, हा तुझाच नव्हे तर माझ्या संस्कारांचा सुद्धा अपमान आहे. त्यामुळे पारू तुला काही झालं तरी या स्पर्धेत भाग घ्यावाच लागेल.
हे ऐकल्यावर पारू वेस्टर्न आऊटफिट घालून स्पर्धेत भाग घेण्यास सज्ज होते. पारुला हे जमू शकेल का याकडे साऱ्यांचेच डोळे लागून राहिलेले असतात. तेव्हा सगळ्यात आधी गणी पारूचं कौतुक करतो आणि सगळेच जण पारूकडे पाहतच राहतात. मात्र या वेळेला पारूने वेस्टर्न आऊटफिट वर हिल्सच्या चपला घातल्या नसल्याने तिला पुन्हा एकदा बोलणी ऐकावी लागतात.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून निखिल दामलेपाठोपाठ योगिता चव्हाणही घराबाहेर, सदस्यांना अश्रू अनावर
त्यानंतर दामिनी स्वतःच्या पायातील चपला पारूला देते आणि सांगते की, आता हे हिल्स घाल आणि त्यानंतर तुझा आऊटफिट पूर्ण होईल. आणि तू सुंदर दिसशील. आता पारू त्या चपलांवर चालू शकेल का?. तसेच मालिकेच्या पुढील भागात दाखवण्यात आल्याप्रमाणे सर्वाधिक मार्क्स हे दिशाला मिळालेले असतात त्यामुळे दिशा स्वतः आदित्यला सांगते की आता तू माझ नाव ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित कर. दिशा खरंच ब्रँड अँबेसेडर होईल का, की काही चमत्कार होईल? हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.