‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सर्वत्र या पर्वाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या या नव्या पर्वात ‘बिग बॉस’ने केवळ कलाकार मंडळींनाच नव्हे तर गायक, रॅपर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांना देखील संधी देत खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला. अल्पावधीतच या विविध क्षेत्रातून आलेल्या कलाकार मंडळींनाही या पर्वाने आपलंस केलं. यंदाच्या या नव्या पर्वात सुप्रसिद्ध रील स्टार, कोल्हापूरची शान धनंजय पोवार स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहे. डीपी या नावाने चर्चेत असणाऱ्या या रील स्टारचे अनेक चाहते दिवाने आहेत. (Dhananjay Powar Video)
विशेषतः आपल्या रीलने प्रेक्षकांना खळखळवून हसवण्यात धनंजय पोवार नेहमीच सक्रिय असतो. धनंजय पोवार हा कंटेंट क्रियेटर, बिझनेस मॅन तसेच Vlogger आहे. धनंजयच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दहा लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. सोशल मिडियावर महिला केंद्रित समस्या गमतीशीर अंदाजात तो नेहमीच मांडताना दिसतो. महाराष्ट्रातील फेमस रिल्सस्टार आणि प्रसिद्ध उद्योगपती डी पी म्हणजेच धनंजय पोवार हा थोड्याच दिवसांत अधिक लोकप्रिय झाला.
धनंजय पोवार अधिक चर्चेत आला तो म्हणजे त्याच्या महिला केंद्रित विषयांवरील आई व बायकोच्या रील व्हिडीओमुळे. धनंजय आई व बायकोसह अनेक गमतीशीर व्हिडीओ बनवून पोस्ट करत असतो. आणि त्याचे हे व्हिडीओ प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. अशातच आता धनंजयच्या अकाउंटवरुन त्याच्या बायकोने एक रील व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा रील व्हिडीओ तिने धनंजयच्या ‘बिग बॉस’मधील एका वावरानंतर पोस्ट केला आहे.
धनंजय निक्कीबरोबर बसून एकाच ताटात जेवत असतो. आणि त्याचवेळी कॅमेरामध्ये बघत तो त्याच्या बायकोला उद्देशून म्हणतो की, “आज जर माझी बायको हा व्हिडीओ बघत असेल तर बघ, तू मला घे की, खा की करते. ही साऊथ चित्रपट केलेली हिरोईन जेवण जेव असं म्हणत माझं ताट घेऊन बसली आहे”. यावर धनंजयची बायको रागात, “ही हिरोईन ताट घेऊन उभी असेल. पण मी तुम्हाला स्वतः भरवते”. आणि गळ्यातील मंगळसूत्र दाखवत, “हे लायसन्स साताजन्माचं आहे”, असं म्हणते. निक्की व धनंजयच एकाच ताटातील हे प्रेम डीपीच्या बायकोला आवडलेलं दिसत नाही. आता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावर धनंजयची धुलाई होणार का?, हे सारं पाहणं रंजक ठरेल.