Munawwar Faruqui : मुनव्वर फारुकी या नावाला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. स्टॅंडअप कॉमेडीयन, शायर, गायक व अभिनेता यामुळे ओळखला जाणारा मुनव्वर अनेकदा त्याचा प्रक्षोभक विधनांमुळेही ओळखला जातो. अशातच तो एका वादाचे कारण बनला आहे आणि हे कारण म्हणजे त्याने मराठी माणसाविरुध्द केलेलं वादग्रस्त वक्तव्य. नुकतंच त्याने त्याच्या एका स्टॅन्ड अप कार्यक्रमात कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरले होते. या जोकची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे मुनव्वरवर जोरदार टीका सुरू झाली आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. (Munawwar Faruqui controversial statement)
मुनव्वरने त्याच्या मुंबईत आयोजित स्टॅन्डअप कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना विचारलं की “तुम्ही सर्वजण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातूनच आलेले आहात का? तुमच्यापैकी कोणी लांब राहतं का?” त्यावर प्रेक्षकांमधून होकारार्थी उत्तर दिलं. त्यावर मुनव्वरने “कुठून आलात?” असं विचारलं. त्यावर प्रेक्षकांमधून कुणीतरी “तळोजा, मुंबईबाहेरून आलो आहे” असं म्हटलं. यावर मुनव्वरने, “हे लोक आज सांगत आहेत की, ते प्रवास करुन आलेत, अन्यथा यांचे गाववाले लोक यांना विचारतात, कुठे राहता? तेव्हा हेच लोक त्यांच्या गाववाल्यांना सांगतात की आम्ही मुंबईत राहतो. हे कोकणी लोक सगळ्यांना च** बनवतात”
यानंतर त्याने तळोजावरून आलेल्या प्रेक्षकांना विचारलं, “तुम्ही कोकणी आहात का?” त्यावर समोरून होकारार्थी उत्तर मिळाल्यावर तो जोरजोराने हसू लागला. त्याच्या या परफॉर्मन्सची काही सेकंदाची क्लिप इंटरनेटवर व्हायरल होऊ लागली, तेव्हा हे प्रकरण वाढू लागले. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून योगेश चिल्ले यांनी त्याला व्हिडीओद्वारे धमकीवजा इशारा दिला आहे. “मुनव्वर फारुकी तुझ्यामते कोकणी माणूस चू** बनवतो, तर कोकणी माणूस चू*** नाही बनवत तुझ्यासारख्यांना रस्त्यावर तुडवतो. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर माफी माग नाहीतर जिथे दिसशील तिथे कोकणी माणूस तुला तुडवणार” असं म्हणत इशारा दिला आहे.
त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस १७’मुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत आला होता. परंतु, त्याने लोकांची मने जिंकली आणि ट्रॉफी पटकावण्यात तो यशस्वी ठरला. ‘बिग बॉस १७’ जिंकल्यानंतर मुनव्वर आपल्या स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेत परतला. पण, आता तो पुन्हा वादात अडकला आहे. मुनव्वर याच्या या विनोदाचा मनसेनेही निषेध केला असून, मुनव्वर आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अशा अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिला आहे.