‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. अशातच मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षक आवर्जून बघत आहेत. मालिकेत आनंदी घर सोडून आली आहे आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न ही करताना दिसतेय. अशातच मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, आनंदीने ‘गंध मातीचा कार्यशाळा’ ही मातीकामाची कार्यशाळा लहान मुलांसाठी सुरु केलेली असते.(Nava Gadi Nav Rajya Promo)
स्वावलंबी होण्यासाठी आनंदीचा हा प्रयत्न असतो. तर या तिच्या प्रयत्नाला नंदू ही तिला मदत करतो. आनंदीच्या या गंध मातीचा कार्यशाळेत बरीच मुलं ही शिकायला येतात. मुलांना मी महिन्याच्या सुट्ट्या लागलेल्या असतात त्यामुळे बरीच मुलं ही कार्यशाळेत येतात.
पहा ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेच्या प्रोमोमध्ये आलाय ट्विस्ट (Nava Gadi Nav Rajya Promo)
अशातच चिंगी सुद्धा राघव कडे कार्यशाळेत जायचा हट्ट करते, राघव तिला घेऊन कार्यशाळेत यायला ही निघतो. मात्र तिथवर येईपर्यंत त्या दोघांनाही माहित नसत की ही कार्यशाळा आनंदीची आहे.राघव आनंदीला घेऊन कार्यशाळेत येतो आणि तेव्हा चिंगी पुढे येते आणि येऊन आनंदीच्या बाजूला बसते, मात्र आनंदी मुलांना शिकवण्यात व्यस्त असते, (Nava Gadi Nav Rajya Promo)
हे देखील वाचा – मेटा गाला मध्ये आलियाला ऐश्वर्या अशी हाक मारली तरी तिने राखले परिस्थतीचे भान
आनंदीला पाहून चिंगीच तीच मन भरून येत, तर राघवही आनंदीला पाठमोर बसलेलं पाहतो तो आनंदी आहे का याची खात्री करायला जाणार इतक्यात राघवला वर्षाचा फोन येतो. वर्षा फोन करून रडत रडत सांगते की, दादा तो नंदूला मारतोय तू लवकर ये, तर इकडे वर्षाचा नवरा नंदूला मारत असतो. आता राघव आणि आनंदीची भेट होणार का हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.
