काही कलाकारांची चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ पाहायला मिळते. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन त्या कलाकारा बद्दल प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. प्रेक्षकांच्या मनात घर केलेला असाच एक अभिनेता म्हणजे दाक्षिण्यात सुपरस्टार चियान उर्फ विक्रम. विक्रमचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. पण विक्रमच्या चात्यांसाठी एक काळजी करण्यासारखी माहिती समोर आली आहे. शूटिंग दरम्यान विक्रमचा अपघात झाला असून त्याच्या बर्कड्याना जबर मार लागल्याचे सांगण्यात आले आहे.(South Star Vikaram Accident)
विक्रमाच्या मॅनेजर ने या बद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे.
विक्रमाच्या PS2 या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. बॉक्स ऑफिस वर ही या चित्रपटाने चांगलीच कमाई केलेली पाहायला मिळते. या चित्रपटात त्याच्या सोबत बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या देखील उत्तम भूमिकेत पाहायला मिळते. विक्रम आणि ऐश्वर्या यांच्या सोबत या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी कार्थी, जयांम रावी, प्रभू हे अभिनेते देखील पाहायला मिळतायत तर अभिनेत्रींपैकी ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता देखील या चित्रपट दिसत आहेत.(South Star Vikaram Accident)
हे देखील वाचा – ‘चाहत्यांच्या गर्दीत रमले मामा,पण पाकीट गेलं चोरीला’तरी पाकीट चोरणाऱ्याची अशी झाली होती फजिती……
PS2 च शूटिंग संपवून विक्रम ने त्याच्या आगामी थंगालन या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले आणि त्याच चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान त्याला ही गंभीर दुखापत झाली आहे. प्रेक्षकांकडून त्याला लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना केली जात आहे.