बॉलिवूडमधील धर्मेंद्र हे लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षीदेखील ते चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे या वयातदेखील ते वर्कआऊट करताना दिसतात आणि त्यांच्या आरोग्याकडेदेखील लक्ष देत असतात. मात्र तरुणपणात ते व्यसनाच्या आहारी गेले होते असे त्यांनी स्वतः सांगितले होते. मात्र यातून नंतर त्यांनी स्वतःला कसं सावरलं आणि त्याचे काय परिणाम झाले हे त्यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते. त्याबद्दल स्वतः धर्मेंद्र यांनी काय खुलासे केले हे आता आपण जाणून घेऊया. (dharmendra on Drinking habits)
धर्मेंद्र यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना दारु पिण्याचेही व्यसन लागले होते. चित्रपटाच्या सेटवर देखील दारु पित असत. याबद्दल त्यांनी स्वतः या गोष्टींची कबुली दिली आहे. त्यांना दारुडादेखील बोलले जायचे. याबद्दल त्यांनी रजत शर्माच्या एका शोमध्ये याबद्दल सांगितले होते. त्यांनी ‘शोले’ चित्रपटाच्या सेटवर झालेला एक प्रसंग सांगितला.
या शोमध्ये रजत यांनी विचारले की, “अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत की तुम्ही स्वतःवर लक्ष देत नाही. दारु प्यायला सुरुवात केली तर थांबत नव्हतात का?”, त्यावर धर्मेंद्र यांनी उत्तर दिले की, आता मी कधीही आरसा पाहतो तेव्हा तो मला सांगतो की प्रेमाने नाही तुला तर दारुने मारलं आहे. त्यावर मी देखील आरशाला उत्तर देतो की, दारु नसती, प्रेम नसतं तर हे असं काही जगणं असतं का?”
त्यानंतर त्यांना विचारले की, “तुम्ही न थांबता दारू प्यायचात का?”, यावर धर्मेंद्र यांनी उत्तर दिले की, “असं नाही आहे. मधल्या काळात मी सहा महीने दारू सोडली होती. बॅडमिंटन खेळायचो. व्यायाम करायचो आणि लक्ष द्यायचो. नंतर पुन्हा दारू पिण्यास सुरुवात करायचो.” त्यानंतर त्यांना विचारले की, “तुम्ही या क्षेत्रातील बुजर म्हणजे दारुडे आहात का?, त्यावर धर्मेंद्र यांनी उत्तर दिले की, “माझं लिव्हर खूप मजबूत आहे”. त्यांनी ‘शोले’चित्रपटाचा किस्सादेखील सांगितला. म्हणाले, “आमचा कॅमेरामन जिम यांच्याकडे पाच-सहा बियरच्या बाटल्या असायच्या. मी त्यांच्या मागे बसायचो आणि लपून-छपून त्यांच्याकडच्या बाटल्या संपवायचो. मी तेव्हा एकाच वेळी १२ बॉटल बियर प्यायलो होतो. तुम्ही तुमचं आयुष्य एंजॉय करायला शिकलं पाहिजे”. २०१० साली धर्मेंद्र हे खूप आजारी पडले तेव्हा त्यांनी दारू पिणे सोडले. त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीही दारू न पिण्याचा निर्णय घेतला.