Big Boss OTT Winner : ‘बिग बॉस ओटीटी’चे तिसरे पर्व नुकतेच पार पडले आहे. शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा पार पडला. सुरुवातीला १६ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. आतापर्यंत यामध्ये अनेक ट्विस्टदेखील पाहायला मिळाले. मात्र आता या पर्वाचा विजेतादेखील घोषित करण्यात आला आहे. या पर्वाच्या ट्रॉफीवर अभिनेत्री सना मकबुल हीने आपले नाव कोरले आहे. यावेळी तिच्याविरोधात नॅजी हा प्रतिस्पर्धक म्हणून होता. काही मतांनी पराभव करुन सना विजेती झाली आहे. विजेती म्हणून सनाला ट्रॉफी व २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी’ची चर्चा सुरु होती. शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये रणवीर शोरी, सना व नैजी हे उरले होते. मात्र टॉप ३ मधून रणवीरदेखील बाहेर पडला. घराबाहेर आल्यानंतर रणवीरची प्रतिक्रियादेखील आता समोर आली आहे. ग्रँड फिनालेचा जल्लोष पाहायला मिळाला. अरमान मलिक, पायल मलिक, रणवीर यांच्याश इतर स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. सर्व जल्लोष झाल्यानंतर अनिल कपूर यांनी सनाचे नाव विजेती म्हणून घोषित केले.
विजेता घोषित झाल्यानंतर रणवीरची आश्चर्यकारक प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने म्हंटले की, “जर केवळ सोशल मीडियाच्या फॉलोअर्सच्या आधारे जर शोमध्ये राहता येत असेल तर त्यापेक्षा चांगलं हे आहे की ज्याचे सोशल मीडियावर अधिक फॉलोअर्स आहेत त्यांनाच ट्रॉफी द्या”. हे बोलताना त्यांच्या मनातील खंत ही दिसून येत होती. रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे.
यामध्ये तो मीडियाबरोबर असभ्यपणे बोलताना दिसत आहे आणि तो काही प्रश्नांची उत्तरेदेखील देत नाही आहे. याबरोबरच तो म्हणाला की, “सनापेक्षा अधिक लायक स्पर्धक या शोमध्ये होते जे जिंकू शकत होते”. रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी खूप प्रतिक्रियादेखील् दिल्या आहेत.