अनेक प्रेक्षक हे मालिकांचे चाहते असतात. मालिका सुरु झाल्यापासून ते प्रत्येक मालिकेवर, मालिकेतील पात्रांवर प्रेम करतात. कालांतराने जेव्हा मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येऊ लागतात तेव्हा हे ट्विस्ट बरेचदा प्रेक्षकांच्या अंगवळणी पडत नाहीत. आणि मग प्रेक्षक व मालिका यांच्यात ताटातूट होते. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षक या मालिकेच्या प्रेमात होते. जयदीप-गौरी, नित्या-अधिराज या पात्रांबरोबर माई हे पात्रही महत्त्वपूर्ण होतं. याशिवाय इतरही पात्र आपापल्या भूमिका उत्तम वाढवताना दिसल्या. (Kapil Honrao On Varsha Usgaonkar)
अशातच मालिकेतील माई या पात्राने मालिकेचा निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे. प्रेक्षकांची ही लाडकी माई म्हणजेच अभिनेत्री वर्षा उसगांवकर साध्य ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात यांनी सहभाग घेतला आहे. ‘बिग बॉस’च्या या घरातील पहिल्या स्पर्धकाची एण्ट्री झाली तेव्हा साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. या पहिल्या स्पर्धक म्हणजे ९०च्या दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर वर्षा यांनी ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री केली आहे.
वर्षा या मालिकेत उत्तम खेळ खेळताना दिसत आहेत. शिवाय वर्षा यांना काही स्पर्धकांनी पहिल्या दिवसापासून धारेवर धरायला सुरुवात केली आहे. निक्की तांबोळी हिने ‘बिग बॉस’च्या या घरात वर्षा यांना टार्गेट केलं असून त्यांचा अपमान करायलाही मागे पुढे पाहिलेलं नाही. शिवाय अतिशय वाईट शब्दांत त्यांचा पाणउतारा केला आहे. वर्षा यांच्या या अपमानावर आता सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी भाष्य करत आवाज उठवला आहे. यामध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील वर्षा म्हणजेचं माई यांचा मुलगा कपिल होनराव याने देखील वर्षा यांची बाजू घेत एक पोस्ट शेअर केली आहे.
वर्षा यांना कपिलने सपोर्ट करत, “खूप स्ट्राँग रहा माई. सर्वांनी तिला खूप त्रास दिला. ज्यांनी तुला वाटेत झोपायला लावलं त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र. रितेश भाऊ बरोबर क्लास घेतील या सगळयांची अशी आशा आहे”, असं म्हटलं आहे. शिवाय यावेळी त्याने माई अपसेट असतानाचा मालिकेतील एक त्यांच्यबरोबरचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो वर्षा यांना धीर देतानाही दिसत आहे.