टीआरपी च्या शर्यतीत अनेक काळ अवलं ठरणारी मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते. कलाकारांच्या अभिनयातील सहजतेमुळे या मालिकेने चांगलेच यश मिळवले आहे. अनिरुद्ध म्हणजे अभिनेता मिलिंद गवळी यांनी त्यांच्यातला खलनायक अशा पद्धतीने साकारला आहे की प्रेक्षकांनी कायम त्यांच्या कामाची पावती त्यांना दिली आहे. (Milind Gawali Twisha Ayare)
पण मिलिंद जसे मालिकेत पहायला मिळतात त्याच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे ती खऱ्या आयुष्यात पहायला मिळतात.त्यांच्या सोशल मीडियावरून ते बरेचदा संवेदनशील पोस्ट शेअर करत असतात.असाच एक मालिकेतील जानकी सोबतचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.त्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये त्यांनी असं म्हंटल आहे, शूट करताना, लहान मुलं सोबत आणि प्राण्यांना सोबत शूट करणं सगळ्यात कठीण असत, असाच लहान मुलां बरोबर शूट करतानाचे जुने किस्से त्यांनी सांगितले,फार कमी दिगदर्शकांना मुलांसोबत काम करता येत असं त्यांचं म्हणणं आहे.
पाहा का काढलं मिलिंदने असिस्टंटला कामावरून ? (Milind Gawali Twisha Ayare)
त्यांचा दुसरा चित्रपट ‘वक्त से पहले’ मध्ये .लहान बाळाच्या रडण्याचं सिन होता तर बाळाने रडावं म्हणून त्या चित्रपटाच्या असिसीटंटने त्या बाळाला चिमटा काढला ते बाळ अक्षरश कळवलं. म्हणून मिलिंदने त्या असिसीटंटला चित्रपटातून काढायला लावलं.आणि त्या अनुभवा नंतर त्यांनी ठरवलं कि आपण आपल्या बाळाला कधी या सिनेमा च्या शूटिंग साठी पाठवायचं नाही.(Milind Gawali Twisha Ayare)
हे देखील वाचा : ‘आणि म्हणून माझ्या घरी त्यांचं येणं राहून गेलं..’ म्हणत मिलिंद गवळी झाले भावुक
यासोबत त्यांनी ‘सात फेरे’ मालिकेतली देखील एक किस्सा सांगितलं की, त्या मालिकेत एक सहा वर्षाची मुलगी काम करत होती. तिने त्या आधी कळत नकळत नावाच्या चित्रपटात काम केले होते. त्या मुलीला डायलॉग बोलता येत नव्हते म्ह्णून, त्या मालिकेचे दिग्दर्शक त्या मुलीला इतके ओरडले की ती ओक्सबोक्शी रडू लागली. त्या दिग्दर्शकाने त्या मुलीला मालिकेतून काढून टाकलं. त्या नंतर त्या मालिकेचे जे कॅमेरामन होते त्यांच्याच मुलीची निवड करण्यात आली. ती मुलगी ही लहानच होती परंतु तिचे वडील स्वतः कॅमेरामन असल्यामुळे, त्या दिग्दर्शकाला तिच्या वर ओरडता यायचे नाही. तिच्या कलानेच त्याला घ्यावं लागायचं. हे पाहून मिलिंदना फार आनंद झाला होता.

त्याच बरोबर त्यांनी, आई कुठे काय करते मालिकेत जानकी म्हणजे त्विषाच्या कलाने घेऊन शूट केलं जात. ती जागी असेल, हसत खेळत असेल तर बाकीचं शूट थांबवून तीच शूट केलं जात. त्विषा खेळतानाचा जो BTS व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे त्या वरून कळून येईल की तिच्या सोबत कस शूट केलं जात. त्या नंतर ते असं ही म्हणाले कि अनिरुद्धचे सिन करताना जितका स्ट्रेस येतो तो ताण त्विषा कडे पाहिलं कि निघून जातो. (Milind Gawali Twisha Ayare)