पोवाडा हा प्रबोधन करणारा प्रकार आहे. आणि ही महाराष्ट्राची शाहिरी परंपरा जपणारे कलावंत म्हणजेच शाहीर साबळे. शाहिरांनी महाराष्ट्राच्या लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावरील जीवनपट “महाराष्ट्र शाहीर” आज संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला, या निमित्ताने अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. (Ashwini Mahangade New Post)
हे देखील वाचा: अरुंधती-आशुतोष जाणार हनिमूनला,मालिकेत येणार ट्विस्ट
या पोस्टमध्ये अश्विनीने माई म्हणजेच मालती बाई यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केलाय. मालती बाई या शाहीर साबळे यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. या फोटोला अश्विनीने “महाराष्ट्र शाहीर” या चित्रपटामध्ये मी ज्यांची भूमिका साकारली आहे त्या “माई”. मी भारावून गेले जेव्हा मी स्वतः ला रुपेरी पडद्यावर पाहिले. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा एक भाग होणे ही भाग्याची गोष्ट वाटतेय मला.

रसिक मायबाप प्रेक्षक हो आम्ही प्रत्येकानी आमचे आमचे १००% देण्याचा प्रयत्न केलाय. तो प्रयत्न यशस्वी झाला की नाही हे मात्र तुम्ही सांगण्याची गरज आहे. म्हणूनच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जावून तुम्ही महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पहा. असं कॅप्शन देत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं आव्हान देखील केलं आहे. अश्विनीच्या या पोस्टवर या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी “You have done super job” अशी कमेंट केली आहे. तसेच अभिनेत्री सना शिंदे हिने “माई” असे म्हणत हार्ट इमोजी पाठवली आहे. (Ashwini Mahangade New Post)
हे देखील वाचा: ‘अभिनेत्याचा मुलगा तरीही लोकांची टीका आणि विनोदाचं फसणार टायमिंग’ वाचा प्रेक्षकांच्या लाडक्या राजुची स्ट्रगल स्टोरी
अश्विनीची या चित्रपटासाठीची निवड ऑडिशन द्वारे झाली होती. अश्विनी रात्रीची उशिरा घरी आल्यानंतर तिने या चित्रपटासाठी ऑडिशन घरूनच दिले होते. त्यानंतर अश्विनीची या चित्रपट “माई” या भूमिकेसाठी निवड झाली होती.