मनोरंजन विश्वातील कलाकार व त्यांच्या कामाबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. कलाकारांच्या कामाव्यतिरिक्त त्यांच्या खाजगी आयुष्यात काय चाललं आहे, जे जाणण्यातही चाहते उत्सुक असतात. अशीच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरबद्दल जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना कायम रस असतो. बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. करीना कधी तिच्या मुलांमुळे चर्चेत येते तर कधी तिच्या लग्नामुळे. कारण करीनाचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता असून तिचे लग्न मुस्लिम कुटुंबात झालं आहे.
त्यामुळे लग्नानंतर आता करीना कोणता धर्म पाळते? याबद्दल तिच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीने खुलासा केला आहे. करीना कपूर आपल्या मुलांची विशेष काळजी घेते. प्रत्येकजण त्याच्या संगोपनाचे कौतुक करतो. करीना आपल्या दोन्ही मुलांना शिस्तीत ठेवते. यात तिला आया ललिता डिसिल्वा यांचीही उत्तम साथ मिळते. तिच्या मुलांच्या सांगोपणाबद्दल, करीना आपल्या मुलांवर कसे संस्कार करते? त्यांना काय आवडतं? याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.
हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत ललिता डिसिल्वाने करीना कपूर कोणत्या धर्माचे पालन करते? याबद्दल सांगितले. यावेळी त्या असं म्हणाल्या की, “करीना तिच्या मुलांवर खूप प्रेम करते. ती खूप शिस्तप्रिय आई आहे आणि यामागे तिची आई बबिता आहे. करीना कपूर तिच्या आईप्रमाणे ख्रिश्चन धर्माचे पालन करते”. ललिता यापुढे असं म्हणाल्या की, “करीना आपल्या मुलांना प्रत्येक धर्माबद्दल शिकवते. ती तिच्या मुलांना प्रत्येक धर्माची शिकवण देते. होळीपासून ईदपर्यंत प्रत्येक सण ती आपल्या कुटुंबासह व मुलांसह मोठ्या थाटामाटात साजरा करते”.
करीना कपूरची दोन्ही मुलं सोशल या ना त्या कारणाने चर्चेत राहत असतात. यापैकी तैमूर हा सार्वजनिक ठिकाणी शांत असल्याचे पाहायला मिळाले आहे तर जेह हा अनेकदा मजा करताना दिसतो. दरम्यान, करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘द बकिंगहॅम मर्डर’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ती नुकतीच ‘क्रु’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती.