‘पारू’ या मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, अखेर हरीश पारुला सोडून कायमचा निघून गेलेला असतो. मात्र हरीश व पारू यांच्यात नेमकं काय झालं हे सत्य अद्याप कोणासमोरही आलेलं नसतं. तर इकडे मारुती ही पारूचं लग्न तुटलं म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करतो मात्र त्यावेळी किर्लोस्कर कुटुंबातील सगळीच मंडळी मारुतीला धीर देतात. तर अहिल्यादेवींना स्वतःवरच खूप राग येत असतो की, हरिश असं कसं काय करु शकतो माझी निवड चुकू शकत नाही, पण नेमकं चुकतंय कुठे हे त्यांना कळत नव्हतं. त्यामुळे त्या त्रागा करत असतात तर इकडे पारूचं सत्य सावित्रीशिवाय कोणालाही माहीत नसतं. (Paaru Serial Update)
इकडे हे सत्य हरीशला माहित असतं मात्र तो तिथं नसतो. तर आदित्य पारूकडून नेमकं काय सत्य आहे हे जाणून घेण्याचा बरेचदा प्रयत्न करतो, मात्र पारू त्या वेळेला काहीच बोलत नाही. ज्या वेळेला पारू मंदिरात देवाची माफी मागायला येते त्यावेळेला ती असाही निर्णय घेते की, आता हे मंगळसूत्र मी काढून ठेवणार त्याच वेळेला तिथे आदित्य येतो. मंगळसूत्राचे सत्य सांगितलं तर काय होईल याचा विचार करुन पारू हे सत्य पुन्हा एकदा आदित्यपासून लपवून ठेवते, जर हे सत्य आदित्यला कळालं तर आदित्य हे कदापि मान्य करणार नाही आणि आमची कायमची मैत्रीसुद्धा तुटेल आणि किर्लोस्कर घराचे दरवाजे कायमचे बंद होतील हा विचार करुन पारू हे सत्य पुन्हा एकदा लपवते.
तर आदित्य पारूकडून काही मिळतंय का म्हणून बघायला येतो आणि तिच्याशी बोलून तिथून निघून जातो. जाता जाता आदित्यला हरीशच्या घराचा पत्ता मिळतो म्हणून तो आता हरीशला काही करुन गाठावं लागेल नाहीतर तो घर सोडून निघून जाईल त्या आधी मला तिथे पोहोचायला हवं असं म्हणून तातडीने आदित्य गाडी काढतो आणि त्याच्या मार्गी लागतो. त्याच वेळेला तो मध्ये गाडी थांबवून अहिल्यादेवींना फोन लावून सांगतो की, मला हरीशच्या घराचा पत्ता सापडला आहे, मी हरीशच्या घरी जायला निघालो आहे. यावर अहिल्यादेवी म्हणतात की, तू एकटा का जात आहेस?, कोणाला तरी बरोबर घेऊन जायला हवं होतं आणि इतक्या घाईघाईत असं का करत आहेस.
यावर आदित्य सांगतो की, मला माहित आहे तुला या सगळ्याचा किती त्रास होत आहे. त्यामुळे मला काही करुन हरीशला भेटावंच लागेल असं म्हणून फोन ठेवणार इतक्यातच आदित्यला हरीश बाजूने बॅग घेऊन जाताना दिसतो. आता आदित्य व हरीशची भेट होणार का?, हरीश आदित्यला सगळं काही सत्य सांगणार का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.