‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली कुठे गेली या काळजीत संपूर्ण सुभेदार कुटुंब असत. प्रतापच्या म्हणण्यानुसार अर्जुन पोलीस स्टेशनलाही जायला निघतो. त्याचवेळी सायली तिथे येते. सायलीला पाहून सगळे खुश होतात. तेव्हा सायली सांगते मी एकटी नाही तर मी कोणालातरी बरोबर घेऊन आलीआहे. यावर सायलीच्या काळजीपोटी अर्जुन चिडतो तर इकडे अस्मिता आश्रमातून कोणाला तरी आणले असल्याचे बोलते. सायली प्रतिमाला सगळ्यांसमोर उभी करते. कल्पना या बाई कोण आहेत अशी चौकशी करताच अर्जुन पुन्हा त्यांच्यावर चिडतो त्यावेळी प्रताप त्याला शांत करतो. (Tharal Tar Mag Serial Update)
अस्मिता प्रतिमाला तिथेच थांबायला सांगते. त्यावर पूर्णा आई अस्मिताला गप्प करते आणि पाहुण्या आहेत त्या असं म्हणते. प्रतिमाला आता सायली चेहरा दाखवायला सांगते. प्रतिमाचा चेहरा पाहून पूर्णा आईला मागच्या सर्व घटना आणि गोष्टी आठवतात. अर्जुनही प्रतिमाला पाहून सायलीला तुझा अंदाज बरोबर होता असं सांगतो. पूर्णा आई प्रतिमाला कडकडून मिठी मारतात. पण प्रतिमा सायलीच्या मागे लपते. प्रतिमाला पाहून कल्पनाही स्वप्न तर बघत नाही आहे ना असं म्हणते. प्रतापही प्रतिमाची कशी आहेस अशी विचारपूस करतो.
अस्मिता मात्र तू जिवंत कशी आणि चेहऱ्यावर खुणा कसल्या असा उलट प्रश्न तिला विचारते. प्रतिमाला जवळ घ्यायला पूर्णा आई पुढे सरसावताच प्रतिमा मागे जाते. सायली प्रतिमाबद्दल सांगताच चैतन्य वअश्विन तिथे पोहोचतात. त्यांनाही प्रतिमाला पाहून धक्का बसतो. प्रतिमाला पूर्णा आई बोलायला तिच्याशी बोलायला सांगतात पण ती गप्पच असते.
आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, रविराजला पूर्णा आई बोलावून घेते आणि इतक्या वर्षांचा चमत्कार घडल्याचे रविराजला सांगते. आता प्रतिमा समोर आल्याने मालिकेत कोणते नवे ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.