टेलिव्हिजनवरील ‘दिया और बाती हम’ ही लोकप्रिय मालिका होती. या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. संध्या व सूरज ही जोडी आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यांच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. या मालिकेत संध्याची भूमिका अभिनेत्री दीपिका सिंहने केली होती. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मात्र मनोरंजन क्षेत्रामधील दीपिकाचा प्रवास खूप खडतर होता. त्याबद्दल अनेकदा मुलाखतीमधून तिने सांगितले आहे. बालपण ते यशस्वी अभिनेत्री असा तिचा प्रवास हा सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. (deepika singh life)
२०११ साली ‘दिया और…’ या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळवली. दीपिकाने या मालिकेतून चांगलेच नाव कमावले. मात्र अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. लहानपणापासून गरीबीचा सामनादेखील करावा लागल्याचे तिने सांगितले आहे. आज २६ जुलै वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याशी निगडीत काही गोष्टींचा खुलासा झाला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. एका मित्राच्या घरी असताना त्याने अर्ध्या रात्री घराबाहेर काढल्याचे सांगितले आहे. ‘पिंकविला’शी बोलताना तिने याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.
दीपिकाने सांगितले की, “आमचे सधन कुटुंब होते. मात्र व्यवसायात अडचणी यायला सुरवात झाल्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली. एकदा असे झाले की माझ्या आई-वडिलांकडे माझ्या शाळेची फी भरायला पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागला होता. तुमच्याकडे पैसे नसतील तर तिला शिक्षण घेण्यासाठी कशाला पाठवता? असेही मुख्याध्यापक म्हणाले होते”.
पुढे ती म्हणाली की, “आर्थिक संकट असतानाही मी अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले. कुटुंबाची इच्छा नसताही ती करिअर करण्यासाठी मुंबईमध्ये आली. मी मुंबईमध्ये आल्यानंतर एका मित्राच्या घरी राहत होते. पण एक दिवस अचानक त्याने मला अर्ध्या रात्री घरातून बाहेर काढले. त्यामुळे नक्की काय करावं हे समजत नव्हतं. पण असे असतानाही मी संघर्ष केला आणि मी अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण केलं”.दीपिकाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर २०१४ साली दिग्दर्शक रोहित राज गोयलबरोबर लग्न केले. त्यानंतर मी २०१७ साली त्यांना पहिला मुलगा झाला. तसेच सध्या ती ‘मंगल लक्ष्मी’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहे.