काही महिन्यापूर्वी सुरु झालेल्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. वेगळं कथानक असलेली ही मालिका साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत ‘बिग बॉस’ फेम विशाल निकम व जय दुधाणे ही जोडी दिसली होती. ‘बिग बॉस’नंतर या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहता येणार म्हणून त्यांचे चाहतेही खुश झाले होते. मात्र आता या मालिकेतून जय दुधाणेची एक्झिट झाली असल्याचं समोर आलं आहे. पण आता या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. (Jay Dudhane Exit)
काही महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या ‘वेड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून जय दुधाणेने अचानक एक्झिट घेतली आहे. नुकतीच याबाबतची माहिती समोर आली. जयच्या जागी आता अभिनेता संग्राम साळवी ही भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत जय जय घोरपडेची भूमिका साकारत होता आता अभिनेत्याने या भूमिकेला रामराम ठोकला आहे. त्याचा अभिनयही लोकांना आवडत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्याच्यावर मोठा आघात झाला. त्यामुळे वैयक्तिक कारणामुळे त्याने मालिका सोडली आहे.
यानंतर आता जयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही मालिका सोडण्यामागचं स्पष्टीकरण दिलं आहे. “मी एक महिन्यापूर्वी माझे वडील गमावले. हे माझं आणि माझ्या कुटुंबाचं मोठं नुकसान आहे. अनेक वैयक्तिक कारणांमुळे मी स्टार प्रवाह वरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा प्रवास सुरु ठेवू शकणार नाही. संपूर्ण कलाकार व चॅनलबरोबर काम करणं हा एकंदरीत खूप छान अनुभव होता. मला आशा आहे की तुम्ही मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करत राहाल. माझ्या मालिकेसाठी शुभेच्छा आहेत. या संधीबद्दल धन्यवाद”, असं म्हणत त्याने ही पोस्ट केली आहे.
आता जय दुधाणेची ही भूमिका अभिनेता संग्राम साळवी साकारताना दिसणार आहे. संग्रामच्या एण्ट्रीने आता प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. संग्राम साळवीने यापूर्वी स्टार प्रवाह वरील ‘देवयानी’ या मालिकेत संग्राम विखे पाटील ही भूमिका गाजवली होती.