मुंबईसह संपूर्ण राज्यभरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेक मुंबईकर या साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढत आहेत. प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी येथे आज ऑरेंज अलर्ट आहे. मागील काही तासांपासून सुमारे ३० ते ४० मिलिमीटर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरीकांना अडचणीदेखील येत आहेत. याचबद्दल प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने एक व्हिडीओ शेअर करत उपरोधिक पोस्ट शेअर केली आहे.
‘आनंदी गोपाळ’, ‘डबलसीट’, ‘टाईमप्लीज’, ‘क्लासमेट्स’, ‘लोकमान्य’, ‘लग्न पहावे करून’ अशा बऱ्याच चित्रपटांमधून समीरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. समीर अनेकदा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करत असतो.अशातच त्याने आजच्या पावसाबद्दलही एक पोस्ट शेअर केली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून या साचलेल्या पाण्यातून समीर वाट काढत त्याच्या कामावर जात आहे. याचनिमित्ताने त्याने पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – “मला ट्रॉफी नको पण…” ‘बिग बॉस’च्या घरातील ‘या’ स्पर्धकाची अनोखी मागणी, म्हणाला, “ट्रॉफीचं लोणचं…”
समीरने गाडीतून बाहेर साचलेल्या पाण्याचा व्हिडीओ शेअर केला असून त्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्याने असं म्हटलं आहे की, “गाडीची होडी आणि मनाचं वल्हं करा आणि कामाला चला”. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या या व्हिडीओला व कॅप्शनला रिलेट केलं आहे. “सगळीकडे हीच परिस्थिती आहे, “बरोबर माझ्या खिडकीबाहेर पाहिल्यावर मलाही अशाच गोष्टी दिसतात” अशा कमेंट्स केल्या आहेत.
आणखी वाचा – ‘या’ दिवशी सुरु होणार ‘बिग बॉस’चे १८वे पर्व, सलमान खानच असणार होस्ट?, पहिल्या स्पर्धकाचे नावही समोर
दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी येथे ऑरेंज अलर्ट आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे विमान आणि लोकलवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. तर दुसरीकडे मुंबई शहरात धुवाधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. पावसामुळे पहिली ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालयांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.