रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लेकीच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडून गेला सुप्रसिद्ध अभिनेता, सोनू निगमही ‘ते’ दृश्य पाहून ढसाढसा रडला अन्…; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 23, 2024 | 7:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sonu nigam at tisha kumar prayer meet

Video : लेकीच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडून गेला सुप्रसिद्ध अभिनेता, सोनू निगमही 'ते' दृश्य पाहून ढसाढसा रडला अन्...; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेते, चित्रपट निर्माते व टी-सिरिजचे सह-मालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशाचे वयाच्या २० व्या वर्षी निधन झाले. अगदी लहान वयामध्ये तिचे निधन झाल्याने मनोरंजन क्षेत्रात दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिचा मृत्यू जर्मनीमध्ये झाला. मृत्यूनंतर तिचा मृतदेह भारतात आणला गेला. त्यानंतर तिच्या अंत्यविधीसाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. त्यावेळी तिच्या आई-वडिलांची अवस्थादेखील खूप वाईट असल्याचेही दिसून आले आहे. यावेळचे सर्व व्हिडीओ आता समोर आले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. (sonu nigam at tisha kumar prayer meet)

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वडील कृष्ण कुमार त्यांची मुलगी तिशाच्या चितेला मुखाग्नि देताना दिसत आहेत. यावेळी त्यांची अवस्था पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. यावेळी त्या ठिकाणी गायक सोनू निगमदेखील उपस्थित असलेला दिसून आला. सोनू हा तिशाला तिच्या बालपणापासून ते आतापर्यंत चांगला ओळखत असतो. त्यामुळे जी मुलगी डोळ्यासमोर मोठी झाली तिचा मृत्यू समोर पाहून त्याला खूप गहिवरुन आलेले दिसून आले.

आणखी वाचा – चारुहासने भूवनेश्वरीला हाताला धरुन काढलं घराबाहेर, अक्षरा-अधिपतीचा परदेशात हनिमून सुरु असताना मोठा वाद, काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by Movified (@movifiedbollywood)

हा व्हिडीओ पाहून सोनूला कृष्ण कुमार यांचे दु:ख पूर्णपणे समजल्याचे दिसून आले. तिथे असलेल्या गर्दीतून रस्ता काढत सोनू कृष्ण कुमार यांच्या पायाशी बसलेला दिसून आला. सोनूने त्यांच्या मांडीवर डोकं देखील ठेवलं. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच जण भावूक झालेले दिसून आले. यावेळी सोनूची पत्नीदेखील तिथे असून दोघांनाही ती सांभाळताना दिसणार आहे.

आणखी वाचा – २२ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट, ४५व्या वर्षी पहिल्या बायकोच्या मैत्रिणीशीच हिमेश रेशमियाने केलं दुसरं लग्न अन्…; असं का वागला?

सोनू व टी-सीरिजचा खूप घनिष्ठ संबंध आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते एकत्रितपणे काम करताना दिसतात. त्यांनी एकत्रितपणे अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यामुळे तिशाच्या मृत्यूने सोनूला खूप दु:ख झालेले दिसून आले आहे. या व्हिडीओची चर्चा आता सर्वत्र दिसून येत आहे.  

Tags: krushna kumarsonu nigamt-seriestisha kumar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
zaheer iqbal on shatrughan sinha

खरंच लेकीच्या लग्नासाठी शत्रुघ्न सिन्हांचा होता नकार?, झहीर इकबाल म्हणाला, "प्रपोज करण्यासाठी गेलो आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.