बॉलिवूड अभिनेते, चित्रपट निर्माते व टी-सिरिजचे सह-मालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशाचे वयाच्या २० व्या वर्षी निधन झाले. अगदी लहान वयामध्ये तिचे निधन झाल्याने मनोरंजन क्षेत्रात दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिचा मृत्यू जर्मनीमध्ये झाला. मृत्यूनंतर तिचा मृतदेह भारतात आणला गेला. त्यानंतर तिच्या अंत्यविधीसाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. त्यावेळी तिच्या आई-वडिलांची अवस्थादेखील खूप वाईट असल्याचेही दिसून आले आहे. यावेळचे सर्व व्हिडीओ आता समोर आले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. (sonu nigam at tisha kumar prayer meet)
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वडील कृष्ण कुमार त्यांची मुलगी तिशाच्या चितेला मुखाग्नि देताना दिसत आहेत. यावेळी त्यांची अवस्था पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. यावेळी त्या ठिकाणी गायक सोनू निगमदेखील उपस्थित असलेला दिसून आला. सोनू हा तिशाला तिच्या बालपणापासून ते आतापर्यंत चांगला ओळखत असतो. त्यामुळे जी मुलगी डोळ्यासमोर मोठी झाली तिचा मृत्यू समोर पाहून त्याला खूप गहिवरुन आलेले दिसून आले.
हा व्हिडीओ पाहून सोनूला कृष्ण कुमार यांचे दु:ख पूर्णपणे समजल्याचे दिसून आले. तिथे असलेल्या गर्दीतून रस्ता काढत सोनू कृष्ण कुमार यांच्या पायाशी बसलेला दिसून आला. सोनूने त्यांच्या मांडीवर डोकं देखील ठेवलं. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच जण भावूक झालेले दिसून आले. यावेळी सोनूची पत्नीदेखील तिथे असून दोघांनाही ती सांभाळताना दिसणार आहे.
सोनू व टी-सीरिजचा खूप घनिष्ठ संबंध आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते एकत्रितपणे काम करताना दिसतात. त्यांनी एकत्रितपणे अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यामुळे तिशाच्या मृत्यूने सोनूला खूप दु:ख झालेले दिसून आले आहे. या व्हिडीओची चर्चा आता सर्वत्र दिसून येत आहे.