काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक यांनी वेगळे होणार असल्याचे जाहीर केले होते. लग्न झाल्यानंतर चार वर्षातच दोघांनी वेगळं होणार असल्याचा निर्णय घेतला. यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या नात्यात दुरावा आला असल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र दोघांनी यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यानंतर लगेचच हार्दिकचा एका मुलीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या मुलीबरोबर त्याच्या अफेअरच्या चर्चादेखील अधिक झाली. आता पुन्हा एकदा हार्दिक एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आला आहे. (ananya pandey and hardik pandya)
काही दिवसांपूर्वी अनंत व राधिका यांचे लग्न मुंबई येथे पार पडले. या शाही लग्न सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील सगळे कलकार उपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी या लग्नसोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री अनन्या पांडेदेखील उपस्थित होती. अनन्याने राधिका व अनंत यांच्या लग्नात खूप धमाल केलेली दिसून आली. याचवेळी अनन्या व हार्दिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे हार्दिकचा घटस्फोट झाल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. आता दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे.
मुकेश व नीता यांचा धाकटा मुलगा अनंत व राधिकाच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. समोर आलेल्या काही व्हिडीओमध्ये नताशा व हार्दिक यांचा धमाल डान्सही पहायला मिळत आहेत. दोघेही एकत्र येऊन धमाल करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये हार्दिक, अनन्या, रणवीर सिंहबरोबर ‘सिंबा’ चित्रपटातील ‘आंख मारे’ या गाण्यावर नाचत आहेत. यावेळी हार्दिक व नताशा यांच्यामध्ये केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.
अनन्या व हार्दिक यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, अनन्या हार्दिकला इम्प्रेस करण्यासाठी चांगला डान्स करत आहे”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “असं वाटत आहे की हे सगळे जबरदस्तीने नाचत आहेत”, तसेच अजून एकाने लिहिले की, “आमचा पांड्या भाऊ बॉलिवूडमध्ये एकटा फसला आहे”. त्यामुळे आता खरच आता हार्दिक व नताशामध्ये काही प्रेमकहाणी आहे का? यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.