‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘गुलाबजाम’, ‘सिंघम’, ”दिल चाहता है’, यांसारख्या चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अभिनेत्रीने आजवर मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी सिनेमाविश्वातही आपली छाप सोडली आहे.अभिनयाबरोबरच सोनाली स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. इतकंच नव्हे तर बिनधास्त व बेधडक स्वभाव यांमुळे ती स्वतःचं मत मांडतानाही दिसते. (Sonali Kulkarni)
सोनालीने नुकतीच ‘आरपार’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना सोनालीने केलेलं वक्तव्य साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे,. सोनालीने यावेळी हळदीकुंकू आणि विधवा स्त्रिया याबद्दल स्पष्टपणे मत मांडलं आहे. स्त्रियांच्या हळदी कुंकूंच्या समारंभाबाबत अभिनेत्रीने तिचं मत मांडलं आहे. सोनालीने यावेळी अनेक गप्पा मारल्या. अनेक विषयांवर तिने दिलखुलास भाष्य केलं.
यावेळी बोलताना सोनालीने असं म्हटलं की, “हळदीकुंकवाचा महिलांच्या लग्नाशी काहीही संबंध नाही. माझ्या आईने कायम हळदी-कुंकू समारंभाला तिच्या लग्न न झालेल्या आणि नवरा नसलेल्या मैत्रिणींनाही बोलावलं आहे. कारण मुळात हळदी-कुंकवाचं उद्दिष्ट हे मैत्रिणींना भेटावं असं आहे. फक्त नटूनथटून सौभाग्यवतींनी हळदी-कुंकवाला यावं, या उद्दिष्टाने मी सुद्धा हळदी-कुंकू करत नाही”.
आणखी वाचा – “घटस्फोटामुळे मी खूप आनंदी”, किरण रावचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “आमिरबरोबरचं नातं…”
पुढे ती असंही म्हणाली आहे की, “मला तुला गजरा देऊ दे, तुझी ओटी भरु दे, हळदी-कुंकू लावायला मिळू दे. या उद्देशाने मी हळदी-कुंकू लावते. मला खूप छान वाटतं. यामध्ये धर्म, जात, मॅरिटल स्टेटस या सगळ्याचा काहीच संबंध नाही आहे. पण ती कृती छान आहे. मला हळदी-कुंकू लावणारे कितीतरी चेहरे माझ्या लक्षात आहेत आणि मी लावताना त्यांचे पाहिलेले चेहरे. कुणाच्या तरी डोळ्यात आईने हळदी-कुंकू लावल्याची आठवण असते. या किती अबोल आणि मनाला भावणाऱ्या गोष्टी आहेत”, असं म्हणत तिने तिचे विचार मांडले.