सामान्य माणूस असो वा कोणता कलाकार आयुष्यात जे स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. कधी कधी कामाच्या व्यापात किंवा काही कारणांमुळे पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण जिद्द ठाम असली कि कधी ना कधी जे मिळवायचंय ते मिळतंच. मराठी मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीच ही असच एक स्वप्न सध्या सत्यात उतरण्याच्या मार्गावर आहे.(Aditi Dravid new business)
आवडती ती कला आणि त्या कलेवर असलेल्या श्रद्धेमुळे ती कला नेहमी डोळ्यासमोर राहावी हा हेतू डोळ्यापुढे ठेऊन अभिनेत्री अदिती द्रविड तिच्या एका स्वप्नाच्या दिषेने पाहिलं पाऊल टाकणार आहे.
लवकरच आदिती स्वतःचा क्लोथिंग ब्रँडचा बिझनेस सुरु करणार असून ‘ड्रेसवाली’ हे तिच्या आगामी ब्रॅन्डचं नाव असणार आहे. त्या संबंधित आदितीने सांगितलं कि कथक या नृत्यप्रकारावर तीच जीवापाड प्रेम आहे. त्यासाठी तिने तिच्या गुरूंकडे योग्य कलेचं शिक्षण ही घेतलं. पण पुढे अभिनय क्षेत्रामुळे तिला हे चालू ठेवणं शक्य नाही पण कथक, भरतनाट्यम किंवा क्लासिकल नृत्य आवडणाऱ्या माझ्या सारख्या सगळ्यांसाठीच या ब्रँड मधून क्लासिकल नृत्य, साऊथ इंडियन डान्स कल्चर दर्शवणारे वेगवेगळं डिज़ाईन्स असणारे कपडे बनवले जाणार आहेत. सोबतच इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आदितीच्या या नवीन ब्रँड द्वारे उपलब्ध होणार असून प्रेक्षकांसाठी ही एक अनोखी पर्वणी असेल.
हे देखील वाचा – ‘लोकनाट्याला उशीर झाला तरी चालेल पण याची चांगलीच जिरवायची…’ म्हणून दादा कोंडके यांनी जिरवली होती ‘त्या’ हॉटेल वाल्याची खोड

अदिती द्रविड ही लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरली होती. तर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात देखील अदिती झळकली होती.(Aditi Dravid new business)