टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान सध्या अधिक चर्चेत आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. मात्र आता ती अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिला स्तनाचा कर्करोग असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिने केमोथेरपीनंतर केसही कापल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतके होऊनही तिने काम सुरु ठेवले. तो व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (hina khan social media post)
आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर ती तिच्या तब्येतीबद्दल नेहमी अपडेट देताना दिसत आहे. सध्या हिना मुंबईमधील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. मात्र तरीही तिचा हसरा चेहरा समोर येताना दिसतो. हिनावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तिला खूप दु:खाचा सामाना करावा लागत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका बेडवर झोपलेली दिसत आहे. तसेच तिच्या हाताला बॅंडही लावलेले दिसून आले. तसेच खिडकीच्या बाहेरील नजारा बघायला मिळत आहे आणि कॅप्शनमध्ये “फक्त एक आणि दिवस, आशीर्वाद”, असे लिहिले आहे.

याबरोबरच हिनाने अजून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने स्वतःच्या भावना शेअर केल्या आहेत. तिने लिहिले आहे की, “मी सतत, प्रत्येक सेकंदाला वाटू शकत की व्यक्ती हसत आहे पण तरीही तो दु:खात असेल. कदाचित कोणतीही व्यक्ती हे सांगत नसेल पण तरीही त्याचं दुखणं असू शकतं. कधीतरी असू शकत की एखाद्याला खुप दुखत असेल पण कदाचित ते खूप जास्त असेल”.
हिनाने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये ती स्वतःसाठी आशिर्वाद मागत आहे.तसेच लवकर बरे व्हावे म्हणून ती प्रार्थनादेखील करा अशी चाहत्यांना विनंती करत आहे. केमोथेरपी झाल्यानंतर तिच्या शरीरावर झालेल्या जखमादेखील दिसून आल्या आहेत.