शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आदल्यादिवशी ते हसत-खेळत होते आणि…”, वडिलांच्या निधनानंतर जय दुधाणेने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “आई व बहिण…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 18, 2024 | 10:14 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Yad Lagla Premacha fame Jay Dudhane first time reacted After death of his father

“आदल्यादिवशी ते हसत-खेळत होते आणि...”, वडिलांच्या निधनानंतर जय दुधाणेने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “आई व बहिण...”

‘बाप’ हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला सुपरहिरो असतो. त्या सुपरहिरोचं अस्तित्व हे प्रत्येक मुलासाठी महत्त्वाचं असतं. पण ते अस्तित्वचं एकेदिवशी  नाहीसं झालं तर कोणताही माणूस अचानक कोलमडून पडतो. असंच काहीसं ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेबरोबर झालं. ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता जय दुधाणे व त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जयचे वडील अनिल दुधाणे यांचे गेल्या महिन्यात मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. जयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली होती.

जयने सोशल मीडियावर वडिलांबद्दल खास पोस्ट करत ‘मी माझा सुपरहिरो गमावला’ असल्याची भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये जयने आपल्या भावना व्यक्त करत “मी हे शेअर करेन असे कधी वाटले नव्हते. २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची व्यक्ती होते” असं म्हटलं होतं. अशातच वडिलांच्या निधनानंतर जयने पाहिल्यांदाच त्याच्या बाबांबद्दलच्या भावणा व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – Video : हेचि दान देगा देवा! विठ्ठल भक्तीत रमले आदेश बांदेकर, अन्नदानही केलं अन्…; साधेपणाचं होतंय कौतुक

जयने नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. या संवादात त्याने असं म्हटलं की, “२३ जूनला मी माझे बाबा गमावले. पण तेव्हापासून मला सतत असं वाटत आहे की, एक आधुनिक शक्ती माझ्यात आली आहे असं मला वाटत आहे. मी त्यांना खूप लवकर गमावलं. ते फक्त ५४ वर्षांचे होते. पण ते माझ्याबरोबर आहेत असं कायम वाटत राहतं. मी कोणतेही काम करत असताना मला सतत एक आवाज येत असल्याचे मला वाटतं. तर आता तेच माझ्यासाठी देव आहेत. हे सगळं माझ्यासाठी खूपच कठीण आहे. पण आई व बहिणीकडे बघून मी ठरवलं की, आपल्याला सावरायला हवं”.  

आणखी वाचा – “आषाढी एकादशीला भारतात नाही पण…”, संकर्षण कऱ्हाडेला परदेशात मिळाला विठ्ठल पूजेचा मान, म्हणाला, “प्रयोग सुरु करायच्या आधी…”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “माझ्या बाबांनी मला लहानपणापासूनच आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं होतं. आजच्या दिवसासाठीच त्यांनी ते करुन ठेवलं होतं असं मला वाटतं. कारण अशी वेळ कधीच कुणाला सांगून येत नाही. ते जायच्या आदल्या दिवशी माझ्याबरोबर बोलत होते. हसत-खेळत होते. उद्या काय करायचं हे बोलत होतो. पण दुसऱ्या दिवशी ते अचानक गेले आणि तेव्हापासून मी आजपर्यंत त्यांचा आवाज ऐकलाच नाही. त्यामुळे आता माझी आई मला फोन करते तेव्हा मी तिच्याशी बाकीची कामं सोडून बोलतो. जे मी आधी करत नव्हतो”. दरम्यान, यापुढे जयने वडिलांच्या निधनानंतर त्यांचा व्यवसाय सांभाळत असल्याचे म्हटले. तसंच बाबा किती तणावाखाली काम करत होते हे मला आता कळत आहे अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या.       

Tags: jay dudhaneJay Dudhane Father Newsmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
anant and radhika in jamnagar

फुलांचा वर्षाव, पारंपरिक थाटमाट अन्...; जामनगरमध्ये राधिका व अनंत अंबानीचे जंगी स्वागत, भारावूनही गेले आणि...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.