जिनिलीया व रितेश देशमुख ही जोडी मराठीसह हिंदी कलाविश्वातील प्रचंड लोकप्रिय जोडी आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलंदेखील आहेत. रितेशची पत्नी जिनिलीया ही मूळची मराठी नसली तरी देशमुखांच्या घरी आल्यावर तिने सगळे मराठी सणवार, रितीरिवाज, परंपरा साजऱ्या केल्या आहेत.
जिनिलीया प्रत्येक मराठी सण आपुलकीने साजरे करताना दिसते. गणपती असो, होळी असो, वटपौर्णिमा असो किंवा आजची आषाढी एकादशी असो. जिनिलीया नेहमीच मोठ्या आनंदाने आपली मराठी संस्कृती कायम जपते. जिनिलीयाने हेच संस्कार तिच्या दोन्ही मुलांवरदेखील केले आहेत. रितेश-जिनिलीया यांच्या दोन्ही मुलांची नावे रियान व राहील अशी असून या दोन त्यांनी आपल्या मुलांवर मराठमोळे संस्कार केले आहेत आणि हे संस्कार वेळोवेळी दिसूनही आले आहेत. अशातच आज सर्वत्र आषाढीनिमित्त भक्तीमय वातावरण असून आज सर्वांचा उपवासदेखील आहे.
आजच्या या आषाढी एकादशीनिमित्त रितेश-जिनिलीया यांच्या मुलांनीदेखील उपवास धरला असून त्यांनी साग्रसंगीत फराळदेखील केला आहे. याची झलक जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली आहे. जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची दोन्ही मुलं, सासू म्हणजेच वैशाली देशमुखही पाहायला मिळत आहेत. “लातूरमध्ये एकादशीनिमित्त दुपारचे जेवण” असं म्हणत तिने हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – “माझं लग्न…”, वैवाहिक आयुष्याबद्दलच्या अफवांवर गीता कपूर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या, “मी गुपचूप…”
जिनिलीया व रितेश ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारी जोडी आहे. रितेश व जिनिलीया हे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. जिनिलीया व रितेश हे त्यांच्या मुलांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरुन पोस्ट करताना दिसतात.