‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली जेवणात अर्जुनच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवते. अर्जुनला खाली जेवायला बोलावताच अर्जुनला तन्वीचा फोन येतो आणि अर्जुन जेवण न जेवता तसाच घाईत निघून जातो. तन्वीने बोलावलेल्या ठिकाणी अर्जुन पोहोचताच त्याला तन्वीकडून कँडल लाईट डिनरचं सरप्राईज मिळतं. तर सायली इथे घरी अर्जुनच्या आवडीचा स्वयंपाक करुनही तो न जेवता निघून गेल्याने ती नाराज होऊन बसते. अर्जुनच वागणं तिला अस्वस्थ करत असल्याने ती न राहवून अर्जुनला फोन करते आणि तेव्हा तो सतत तिचे फोन कट करतो. (Tharal Tar Mag Serial Update)
अर्जुन तन्वीशी बोलत असताना मध्येच तो केसबद्दल बोलतो तेव्हा तन्वीला एकदम विचित्र वाटतं. सायली मात्र वारंवार अर्जुनला फोन करते पण अर्जुन तिचे कॉल्स कट करतो. अखेर तन्वी हे बघून अर्जुनला काही महत्त्वाच्या कामाचा फोन असल्यास घ्यायला सांगते. त्यानंतर अर्जुन सायलीचा फोन घेत तिला तन्वीला भेटायला आलो असल्याचं सांगतो. आणि आश्रम केसबद्दल जाणून घ्यायला आल्याचेही सांगतो, हे ऐकताच सायली नक्की आश्रम केसचाच विषय सुरु आहे की प्रेमाचा असा खोचक प्रश्न अर्जुनला विचारते. अर्जुन सायलीला व्हिडीओ कॉल म्यूटवर टाकायला सांगतो. नागराज पैसे मिळवण्यासाठी कपाटाच्या किल्ल्या गुपचूपपणे मिळवत कपाटातील दागिने व पैसे चोरतो. पण तेवढ्यात सुमन तिथे येते.
अर्जुन व्हिडीओ कॉल सुरुच ठेवून तन्वीला फोन स्विच ऑफ केल्याचे सांगतो. आवडीचा मेन्यू पाहून अर्जुन खूष होतो. पण हे पाहून सायलीचा मात्र जळफळाट होतो. अर्जुन तन्वीच्या ओठांना लागलेलं जेवण पुसतो हे व्हिडीओ कॉलवर पाहताच सायली फोन कट करते. सुमनला नागराज चोरी करत असल्याचे कळते, पण नागराज तिला रविराजला हे सांगितलं तर तो आत्महत्या करेल अशी धमकी देतो. तन्वी अर्जुनला माझी कंपनी एन्जॉय करत आहेस ना असं विचारताच तो लगेच हो बोलून मोकळा होतो.
मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुन प्रियाचा म्हणजेच तन्वीचा हात पकडत तिला घरी आणतो, हे पाहून कल्पनासकट पूर्णा आईचाही संताप होतो. सायली सांगायला जाताच अर्जुन तिच्यावर डाफरतो की, तू मध्ये पडू नकोस. आता मालिकेत नवा कोणता ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.