‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, हरीश व पारूच्या मेहंदी समारंभाला सुरुवात होते. सगळेचजण तिथे जमलेले असतात तेव्हा अहिल्यादेवी दोघांचं औक्षण करतात त्यानंतर घरातील सगळेजण दोघांचं औक्षण करतात आणि अहिल्यादेवी पारूचा कौतुक करत तिला तिच्या हातावर मेहंदी काढायला सांगतात. त्यावेळेला दामिनी अहिल्यादेवींना थांबवते आणि मेहंदी काढणारीला सांगते की, थांबा तुम्हीच हिचे लाड करुन ठेवले आहेत. त्यामुळे ही डोक्यावर बसली आहे. काय खरं ते तुमच्यासमोर यायलाच हवं. आदित्यने एक सत्य लपवलं तर तुम्ही त्याला एवढी मोठी शिक्षा दिली मग पारूलाही शिक्षा व्हायला हवी. चूक तिथे शिक्षा असं म्हणत दामिनी उगीच आरडाओडा करते. (paaru serial update)
तेव्हा अहिल्यादेवी तिला सांगतात की, काय कोणाची चूक झाली ते मला सांग आणि मुद्द्याचं बोल हे ऐकल्यावर दामिनी पारुला तिथून उठायला सांगते आणि तिच्याजवळ बोलवते. दामिनी म्हणते की, तुम्ही दिलेली तुमच्या आवडीची ही शॉल हिने खराब करुन टाकली. इतकी वर्ष तुम्ही ही शॉल मलासुद्धा दिली नाही आणि जिला दिली तिला त्या शॉलची काळजीसुद्धा नाही आहे. त्या खराब झालेल्या शॉलवर हिने नक्षीकाम केलं आहे. यावर पारू सुद्धा अहिल्यादेवींची माफी मागते आणि सांगते की, हे कोणी केले हे मला खरंच माहिती नाही पण मी जर तसेच घेऊन आले असते तर ते खूप वाईट दिसलं असतं म्हणून मला तेव्हा सुचलं ते मी केलं आणि नक्षीकाम केलं हे ऐकल्यावर दामिनी म्हणते की, पण या मेंदीचे डाग तू कसे घालवले.
हे ऐकल्यावर सगळेजण आश्चर्यचकित होतात. तर पारू विचारते पण हे तुम्हाला कसं कळलं की, या शॉलवर मेहंदी पडली होती. यावर सगळ्यांच्या लक्षात येते की, दामिनीने हे सगळं केलं आहे. तेव्हा दामिनीच्याही लक्षात येत की, मी काय बोलून गेले, असे म्हणत ती शांत बसते. तर इकडे दिशा मात्र काहीच बोलत नाही. त्यानंतर अहिल्यादेवी दामिनीला स्वतःला शिक्षा करुन घ्यायला सांगतात आणि तिला स्वतःलाच कानाखाली मारायला सांगतात. सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा दामिनीचा अपमान होतो. तर इकडे मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, सावित्री आत्या पारूला आता तुझं आणि हरीशचं लग्न होणार आहे त्यामुळे तुला हे मंगळसूत्र काढून ठेवावे लागेल. आता हरीश सर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतील. हे ऐकल्यावर पारू ते मंगळसूत्र काढायला नकार देते आणि सांगते की, मी हे मंगळसूत्र कधीच काढणार नाही आणि मी हे लग्नसुद्धा करणार नाही.
हे ऐकल्यावर सावित्रीला टेन्शन येत. त्यानंतर आदित्य व पारू बोलत असतात तेव्हा आदित्य पारूकडून वचन मागतो की, तू माझ्याबरोबर कायम असशील असं मला वचन दे. तेव्हा पारू सांगते की, मी माझ्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर असेल. तर पारूने आदित्यला दिलेलं वचन आदित्यच्या लक्षात येणार का?, पारू ते मंगळसूत्र काढणार का?, ते लग्न ती कसं मोडणार हे सारे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.