मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व विरेन मर्चंट यांची लाडकी लेक राधिका मर्चंट हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. मुंबई येथे त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातील अनेकांनी उपस्थिती दर्शवली होती. मनोरंजन, क्रीडा, उद्योग या क्षेत्रातील अनेक दिग्गज या शाही विवाहसोहळ्यासाठी उपस्थित होते. सगळ्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अशातच आता केआरकेने आता मुकेश अंबानी यांनी बॉलीवूड अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरीला ३० कोटी रुपयांचे घर गिफ्ट केल्याचे सांगितले होते. स्वतः जावेददेखील हे ऐकून हैराण होते आता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (javed jaferry on house gift)
केआरकेने मिजान जाफरीबद्दल बोलताना सांगितले की, “अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान हा मुंबईमधील वांद्रे येथील संधु पॅलेसमध्ये राहत आहे. यांचे कारण म्हणजे मुकेश यांनी त्याला ३० कोटी रुपयांचे घर गिफ्ट केले आहे. मिजानने अनंत व राधिका यांच्यामध्ये भेट घडवून आणली होती. त्यामुळे इतके महागडे गिफ्ट दिले. काहीही होऊ शकते”. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जावेद यांनी ही पोस्ट आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन शेअर केली व हसून लिहिले की, “काहीही”.
Kuch bhi !!!! 😄 https://t.co/Pu9A8kotCJ
— Jaaved Jaaferi (@jaavedjaaferi) July 14, 2024
जावेद यांची पोस्टही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत एकाने लिहिले आहे की, “केआरके तर आता व्हॉट्सअप फॉरवर्डवर विश्वास ठेवायला लागले”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “जावेद यांनी या पोस्टला खूप गंभीरतेने घेतले”. तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “मी तर ऐकले होते की राधिका व अनंत हे बालपणीचे मित्र आहेत. त्यामुळे यामध्ये किती तथ्य आहे”. त्यानंतर एकाने लिहिले की, “कदाचित या पोस्टमुळे केआरकेच्या घरी चूल पेटेल”.
अनंत व राधिका यांच्या लग्नाचे व रिसेप्शनचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी कुटुंबाने २५ पाहुण्यांना २ कोटी रुपयांचे महागडे घडयाळ गिफ्ट केले आहे. यामध्ये शाहरुख खानचाही समावेश आहे.