आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे लग्न पार पडले. शुक्रवारी १२ जुलै रोजी त्यांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. या विवाह सोहळ्यासाठी केला गेलेला थाटमाट हा फारच नेत्र दीपक होता. या सोहळ्यात केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातील मोठमोठ्या दिग्गज व्यक्तींनीसुद्धा उपस्थिती लावली होती. केवळ सिनेसृष्टीतीलच नव्हे तर अनेक देशाविदेशातील राजकीय मंडळीसुद्धा या शाही विवाह सोहळ्यात उपस्थित होते. या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये एका ११ वर्षांच्या मुलीने सर्वांचे लक्ष वेधले.
अंबानीच्या लग्नात आलेल्या प्रत्येक पाहुण्याबरोबर या मुलीने फोटो काढले असून तिने तिच्या सोशल मीडियावर हे फोटो पोस्टही केले आहेत. हेच फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून दाक्षिणात्य अभिनेती महेश बाबू यांची मुलगी आहे, महेश बाबू यांनी पत्नी नम्रता शिरोडकरबरोबर आली होती. तेव्हा त्यांची मुलगी सिताराही सहभागी झाली होती. सिताराने अंबानीच्या लग्नातील सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराबरोबर हटके पोज देत फोटो काढले.
सिताराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हे फोटो पोस्ट केले असून यामध्ये बॉलिवूडच्या रणवीर सिंहपासून हॉलिवूडच्या कीम कर्दिशीयनपर्यंत आणि रेखापासून ते कियारा अशा अनेक कलाकारांचा सहभाग आहे. सिताराने शेअर केलेले हे पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेकजण तिच्या या फोटोबद्दल तिचे कौतुक करत आहेत. इतर स्टारकिड्सपेक्षा सिताराने शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची मुलगी सितारा ही केवळ ११ वर्षांची आहे. केवळ महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी म्हणून ओळखली जात नाही तर ती एक उत्तम डान्सरही आहे. तिने अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सिताराचे स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट असून १ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सिताराने इतक्या लहान वयात तिच्या वडिलांप्रमाणे प्रसिद्धी मिळवली आहे.