बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर ‘वडापाव गर्ल’ फेम चंद्रिका दीक्षितची पहिली प्रतिक्रिया, गंभीर आरोप करत म्हणाली, “स्वार्थासाठी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 15, 2024 | 3:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
chandrika dixit on big boss ott makers

'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यानंतर 'वडापाव गर्ल' फेम चंद्रिका दीक्षितची पहिली प्रतिक्रिया, गंभीर आरोप करत म्हणाली, "स्वार्थासाठी…"

 सध्या ‘बिग बिग ओटीटी ३’ अधिक चर्चेत आहे. या पर्वामध्ये विविध क्षेत्रातील अनेक ओळखीचे चेहरे बघायला मिळत आहेत. शो सुरु झाल्यापासून यामध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. नुकताच ‘विकेंड का वार’ पार पडला यामध्ये ‘वडापाव गर्ल’ म्हणजेच चंद्रिका दीक्षितला घराबाहेर पडावे लागले. ‘वडापाव गर्ल’ या नावाने तिचा प्रोमोदेखील व्हायरल झाला होता. या प्रोमोमध्ये अनिल कपूर चंद्रिकाला इतरांच्या प्रश्नांवर सतत बोलल्यामुळे फटकारताना दिसले. या आठवड्यात लुकेश कटारिया, विशाल पांडे, चंद्रिका दीक्षित, अरमान मलिक आणि शिवानी कुमारी यांना मिड वीक नॉमिनेशनमध्ये नॉमिनेट करण्यात आले होते. (chandrika dixit on big boss ott makers)

या आठवड्यात लुकेश कटारिया, विशाल पांडे, चंद्रिका दीक्षित, अरमान मलिक आणि शिवानी कुमारी यांना मिड वीक नॉमिनेशनमध्ये नॉमिनेट करण्यात आले होते. अशातच आता चंद्रिका घराबाहेर पडल्यानंतर तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती शोबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. तसेच तिने शोच्या निर्मात्यांवर आरोपदेखील केले आहेत. तिचं हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – लग्न अनंत-राधिकाचं पण चर्चा रणवीर-दीपिकाची, दीपिकाच्या ‘त्या’ कृतीमुळे चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?

View this post on Instagram

A post shared by Bigg Boss ott 3 Khabri (@biggbossott3.tazakhabar)

‘बिग बॉस…’ मधून बाहेर पडल्यानंतर चंद्रिका मुलाखती देत आहे. यामधील एका मुलाखतीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या व्हिडीओमध्ये चंद्रिका शोच्या निर्मात्यांवर रंग काढताना दिसत आहे. तिने सांगितले की, “तुम्ही मला पाडत आहात आणि दुसऱ्याला वर आणत आहात. तुम्ही असे कसे करु शकता. आता समजले आहे की माणूस त्याच्या स्वार्थासाठी काहीही करु शकतो. मी कधीही कोणाचं काही चुकीचं केलं नाही, कोणाचं काही चुकीचं सांगितलं नाही. मात्र तरीही लोक म्हणाले की हीची सकारात्मकतातर गेली आहे आता हीच्याबद्दल काहीतरी नकारात्मक करूया”.

आणखी वाचा – क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयकडून १ कोटीची मदत जाहीर होताच ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले, “तंत्रज्ञ कलावंतांसाठी…”

दरम्यान आता चंद्रिका घरातून बाहेर पडल्यानंतर, एकाची वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. इन्फ्ल्युएन्सर अदनान शेखची वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. अदनान व एल्विश यादव यांच्यात मोठा वाद आहे. त्यामुळे आता या शोमध्ये नक्की काय ट्विस्ट येईल हे पाहाण्यासारखे आहे.  

Tags: big boss ott 3chandrika dixitvadapav girl
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
javed jaferry on house gift

मुकेश अंबानींकडून जावेद जाफरीच्या मुलाला भेट म्हणून तब्बल ३० कोटींचे घर?, इतकं महागडं गिफ्ट देण्याचं नेमकं कारण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.