अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या महिन्यात तिने तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली. दुसऱ्या धर्मातील मुलाबरोबर लग्न केल्याने तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील करण्यात आले. मात्र अनेकांनी तिला पाठिंबाही दिला. सोनाक्षीचे लग्न २३ जून रोजी मुंबई येथे कुटुंबीय व मित्र-मंडळींच्या उपस्थितीत तिचे लग्न पार पडले. यावेळी तिचे आई-वडील उपस्थित होते मात्र तिचे दोन्ही भाऊ गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. यावर सोनाक्षी व तिच्या कुटुंबीयांनी कोणतेही भाष्य केले नव्हते. (luv sinha on sonakshi sinha)
काही दिवसांपूर्वी तिचा भाऊ लवने तिच्याबरोबर आलबेल नसल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा लवच्या एका गोष्टीमुळे ती चर्चेत आली आहे. लवने त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये सोनाक्षी कुठेही नव्हती. त्यामुळे अजूनही भावा-बहिणीमध्ये सुरळीत नसल्याचं बोललं जात आहे.

शत्रुघ्न व पुनम यांचा नुकताच लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यासाठी त्यांच्या तीनही मुलांनी पालकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. लवने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. यामध्ये शत्रुघ्न, पुनम, सोनाक्षीचे भाऊ लव व कुशही दिसत आहेत. मात्र सोनाक्षी दिसत नाही. हा फोटो शेअर करत लवने लिहिले की, “माझ्या पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला तुमची मुलं म्हणून जन्माला येण्याचे भाग्य मिळाले. तसेच तुमच्याबरोबर आम्हाला वेळ घालवायला मिळाला त्यासाठी खूप धन्यवाद”.
लवने शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनाक्षी नसल्याने सगळ्यांनीच तर्क-वितर्क लावले आहेत. सोनाक्षीच्या नवऱ्याबरोबर चांगले संबंध नसल्याचेही अंदाज सगळ्यांनी बांधले होते. लवने देखील काही दिवसांपूर्वी सोनाक्षीच्या लग्नाला अनुपस्थित असल्याचे कारण सांगितले होते. कोणाचेही नाव न घेता झहीरच्या वडिलांबरोबर एकत्र येऊ शकत नाही असे सांगितले होते. सोनाक्षीच्या लग्नात तिचा एक भाऊ कुश हा सहभागी असलेला दिसून आला होता.