शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : विकी कौशलबरोबरच्या गाण्यात तृप्ती डिमरीचे अधिक हॉट सीन, प्रेक्षकांनी राखी सावंत, मल्लिका शेरावतबरोबर केली तुलना, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 10, 2024 | 1:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tripti Dimri Troll

Video : विकी कौशलबरोबरच्या गाण्यात तृप्ती डिमरीचे अधिक हॉट सीन, प्रेक्षकांनी राखी सावंत, मल्लिका शेरावतबरोबर केली तुलना, व्हिडीओ व्हायरल

धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत येत्या १९ जुलै रोजी ‘बॅड न्यूज’ नावाचा चित्रपट येत आहे. या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी, एमी विर्क ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टीझर व ट्रेलरनंतर दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली. चित्रपटातील पहिल्या ‘तौबा तौबा’ या गाण्याने साऱ्यांना विकी कौशलप्रमाणे नाचायला भाग पाडले. तर दुसऱ्या ‘जानम’ या गाण्यालाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं. यांतील तृप्ती डिमरीचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहून सगळ्यांनाच घाम फुटला. मात्र सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी तिची मल्लिका शेरावत व राखी सावंत हिच्याशी तुलना करत ट्रोल केलं आहे. (Tripti Dimri Troll)

‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या ‘जानम’ या गाण्यातील विकी कौशल व तृप्ती डिमरी यांचा रोमान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दोघांची केमिस्ट्री काहींना आवडली तर काहींना ती आवडली नाही. अभिनेत्रीला जी प्रसिद्धी ‘ॲनिमल’ चित्रपटामधून मिळाली, ती आता या सिनेमातील गाण्यांमुळे नष्ट होते की काय असे त्यांना वाटू लागले आहे.

आणखी वाचा – मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी हवी की नको?, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी मांडलं मत, नक्की काय महत्त्वाचं?

View this post on Instagram

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

तृप्ती डिमरीच्या गाण्याची क्लिप शेअर करत एका यूजरने लिहिले की, “तृप्ती डिमरीची लेव्हल घसरत चालली आहे. ‘ॲनिमल’नंतर तिची प्रतिमा खराब होत आहे”. तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “तृप्ती डिमरीची अवस्था पाहता ती मल्लिका शेरावत आणि राखी सावंत बनण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक चित्रपटात तिने स्वतःला असेच एक्सपोज करत राहिल्यास ती काही वेळातच मुख्य भूमिकेतून गायब होईल”. तर आणखी एकाने असे म्हटले की, “तृप्ती डिमरीचे बॉलिवूड करिअर लवकरच संपणार आहे. जसे राखी व मल्लिका शेरावतबरोबर घडले होते”.

आणखी वाचा – नवऱ्याने ज्याच्या कानाखाली मारली त्याच्याच बाजूला जाऊन बसली कृतिका मलिक, अरमान मलिक भडकला, म्हणाला, “तुझे डोळे…”

मल्लिका शेरावत आणि राखी सावंत यांनीही त्यांच्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी असेच काही सीन्स केले, ज्यामुळे त्यांना नंतर चित्रपटांमध्ये कमी भूमिका मिळाल्या आणि सिनेसृष्टीतील त्यांचं करिअर काहीस संपलं. मात्र, तृप्ती डिमरीचे नशीब ‘ॲनिमल’नंतरच चमकले. यानंतर तिच्याकडे एकामागोमाग एक चित्रपट येत गेले. ‘बॅड न्यूज’नंतर ती ‘भूल भुलैया ३’मध्येही दिसणार आहे. त्याचबरोबर ती ‘धडक २’ मध्येही दिसणार आहे.

Tags: bollywood actressentertainmenttripti dimritripti dimri comparisonTripti Dimri Troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Marathi actor Riteish Deshmukh's sons meeting Indian cricketer Sunil Gavaskar and taking an autograph from him video shared on Instagram

Video : घरात सेलिब्रिटी तरीही रितेश देशमुखच्या मुलांनी 'त्या' व्यक्तीला भेटल्यानंतर काय केलं पाहा; व्हिडीओ पाहून संस्कारांचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.