शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका पदुकोणच्या पोटाला हात लावत ओरीने काढला फोटो, ते फोटो पाहून नेटकरी म्हणाले, “आशीर्वाद मिळाला आता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 10, 2024 | 3:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Orry Touches Deepika Padukone Baby Bump

दीपिका पदुकोणच्या पोटाला हात लावत ओरीने काढला फोटो, ते फोटो पाहून नेटकरी म्हणाले, "आशीर्वाद मिळाला आता..."

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण. सध्या ही जोडी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. लवकरच दोघे आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावरुन त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. तेव्हापासून ते दोघे चर्चेत आले असते. अशातच गर्भवती दीपिका पदुकोणचा एक फोटो सोशल मीडियावरुन समोर आला आहे. या फोटोने सोशल मिडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चर्चेत आलेल्या या फोटोमध्ये दीपिका पदुकोण ओरी आणि पती रणवीर सिंगबरोबर आहे. (Orry Touches Deepika Padukone Baby Bump)

समोर आलेल्या फोटोमध्ये ओरी दीपिकाच्या बेबी बंपला हात लावताना दिसत आहे. यावेळी त्याने अभिनेत्रीच्या होणा-या मुलाला आशीर्वाद दिले आहेत. ओरीने हा सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि ओरीचा एकत्रित सुंदर असा फोटो राधिका मर्चंट व अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील आहे. नुकतेच या जोडप्याने अनंत व राधिकाच्या संगीत आणि हळदी समारंभाला हजेरी लावली होती. तासाभरात या फोटोवर कमेंट्स व लाईक्सचा वर्षाव झाला.

आणखी वाचा – Video : विकी कौशलबरोबरच्या गाण्यात तृप्ती डिमरीचे अधिक हॉट सीन, प्रेक्षकांनी राखी सावंत, मल्लिका शेरावतबरोबर केली तुलना, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry)

दीपिका व ओरीच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, “अखेर बाळाला आशीर्वाद मिळाला”. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “हा सर्वोत्तम फोटो आहे”. तर एकाने गमतीत म्हटलं आहे की, “बाळ आता ओरिफाइड आहे”. तर एका चाहत्याने “ओरी काका आशा करतो की भविष्यात तुम्ही आम्हाला दीपिका व रणवीरच्या बाळाचे फोटो दाखवाल”, असे म्हटले आहे. एका चाहत्याच्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे ते म्हणजे, “हे खूप महत्त्वाचे होते. मुलाला आशीर्वाद मिळाला आहे”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, “जावंच लागेल…”

दीपिका व रणवीरने २०१८ मध्ये लग्न केले आणि आता सहा वर्षानंतर ते आई-वडील होणार आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये दीपिका तिच्या मुलाला जन्म देणार आहे. ओरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ‘बिग बॉस १७’ मध्ये सलमान खानला सांगितले होते की, त्याला बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीला आमंत्रित केले जाते. तेथे सेलिब्रिटी त्यांना त्यांच्या पत्नी व मुलांसह फोटो काढण्यास सांगतात आणि ते सोशल मीडियावर शेअर करतात.

Tags: bollywood gossipdeepika padukonentertainmentorryOrry Touches Deepika Padukone Baby Bump
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Jacqueline Fernandez once again summoned by ED for an inquiry in 200 crore money laundering case

मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा ईडीचे समन्स, चौकशीसाठी बोलावलं अन्...; अडचणीत वाढ होणार 

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.