कलाकार निर्मळ भावनेने वेग- वेगळ्या कलाकृतींमधुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात, मनोरंजन, प्रबोधन, सामाजिक भान या गोष्टी जपत जास्तीत जास्त चांगलं काम कसं करता येईल हा त्यांचा प्रयत्न असतो. आणि प्रेक्षकांच्या या अपेक्षांना खरा उतरणारा एक कलाकार म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक. गेले अनेक वर्ष छोट्या पडद्यावर. तसेच मोठ्या पडद्यावर त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्याची आज वरची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहील परंतु त्याच्या धर्मवीर मधल्या आनंद दिघे या भूमिकेला प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळालं आहे.(Prasad Oak)
अभिनयासोबतच दिग्दर्शकाच्या रूपात ही त्याने दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले. कच्चा लिंबू आणि हिरकणीच्या यशानंतर त्याच्या चंद्रमुखी या चित्रपटाला ही भरघोस यश मिळाले. चंद्रमुखीच्या गाण्यांवर प्रेक्षकांसोबत संपूर्ण सिनेसृष्टी देखील थिरकली. हिरकणी, चंद्रमुखी हे चित्रपट स्त्रीप्रधान होते.या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसादने दिग्दर्शक म्हणून देखील त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे.
हे देखील वाचा : मंजिरीच्या प्रश्नांना वैतागला प्रसाद…
आपलं काम चांगलं होत आहे याची पोचपावती पुरस्कारामधून मिळते हे देखील तितकंच खरं आहे.२४ एप्रिल २०२३ रोजी ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ सोहळा पार पडणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.(Prasad Oak)
प्रसादने पुरस्कार केला वडिलांना समर्पित ((Prasad oak)
तर. या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार अभिनेता, दिगदर्शक प्रसाद ओक याला घोषित झाला आहे. चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील त्याच्या कामगिरी बद्दल त्याला हा पुरस्कार देण्यात येत आहे. याच संदर्भातील एक पोस्ट अत्यंत आनंदाची बातमी, या वर्षीचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’ मला जाहीर झाला आहे.हा पुरस्कार स्वीकारताना मला परमानंद झाला आहे.माझ्या चंद्रमुखी व धर्मवीर या दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण टीम चे मी मनपूर्वक आभार मानतो.

मला या पुरस्कारयोग्य समजल्याबद्दल दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो. असे कॅप्शन देत शेअर केला आहे. अनेक कलाकारांनी त्याच्या या पोस्ट वर कमेंट करून अभिनंदन व कौतुक केले आहे.(Prasad Oak)
या सगळ्याच सोबत सध्या प्रसाद बरेच फोटोशूट देखील करत असतो.आणि वेळोवेळी त्याच्या सोशल मीडिया वरून ते शेअर देखील करत असतो. त्याच सोबत मंजिरी सोबतच्या मजेशीर रील देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.
