शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नम्रता संभेरावने जुन्नरमधील गावात बांधलं हक्काचं घर, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 3, 2024 | 2:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame actress Namrata Sambherao shared special photos on social media of her new farmhouse.

नम्रता संभेरावने जुन्नरमधील गावात बांधलं हक्काचं घर, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो

‘जिच्या विनोदाला नाही ठाव’ अशी आपली वेगळी ओळख निर्माण करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या अनेक कार्यक्रमांमधील विनोदी अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या विनोदाच्या उत्तम टायमिंगच्या जोरावर तिने प्रेक्षकांना भरभरून हसवलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे. नाटक, मालिका, चित्रपट व विनोदी रिअॅलिटी शो अशा विविध माध्यमांतून चोख भूमिका साकारत नम्रताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही खास फोटो शेअर केले आहेत. नम्रताने नुकतेच नवीन शेतघर घेतले असून या नवीन शेतघराचे काही खास फोटो तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. पुण्यातील जुन्नर येथे अभिनेत्रीचे नवीन शेतघर असून नुकतीच या घराची पूजा पार पडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

आणखी वाचा – “मला शहाणपणा शिकवू नका”, AI च्या वापराबद्दल सुबोध भावेचं रोखठोक मत, म्हणाला, “कलाकारांच्या पोटावर पाय…”

नम्रताने या नवीन घराच्या पूजेचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. यामधील पहिल्या फोटोमध्ये ती तिच्या नवऱ्यासह उभी आहे. तसेच या फोटोमध्ये त्यांच्या मागे भव्य असे घरही पाहायला मिळत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये नम्रता नवरा व मुलगा रुद्राजसह देवाची आरती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिने शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोमध्ये नम्रता नवऱ्यासह पूजा करताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : पंढरीच्या वारीमध्ये दंग झाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, वारकऱ्यांबरोबर रमला अन्…; साधेपणाचं होतंय सर्वाधिक कौतुक

नम्रताने शेअर केलेले हे खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण तिच्या नवीन शेतघराबद्दल कौतुक करत आहेत. अभिनंदन, खूप शुभेच्छा, क्या बात है, खूप सुंदर घर आहे, अप्रतिम अशा अनेक कमेंट्स करत नम्रताच्या चाहत्यांनी या फोटोला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, नम्रताचया कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच ती ‘नाच गं घुमा’ या चित्रपटांत झळकली होती. या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती.

Tags: maharashtrachi hasyajatramarathi entertainment newsnamrata sambheraoNamrata Sambherao New farmhouse
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Akshata Apte Angry On Ac Train

"मध्य रेल्वेवर AC ट्रेन वेळेवर नाहीत", सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "ट्रेनमध्ये चढून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.